फॅटी लिव्हर ही एक गंभीर समस्या आहे. त्याची लक्षणे सुरुवातीला दिसतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करते, ज्यामुळे स्थिती फॅटी लिव्हर ग्रेड 3 पर्यंत पोहोचते. ग्रेड 3 ही स्थिती खूप गंभीर असते. या स्थितीत उपचार करणे देखील कठीण होते. विशेष म्हणजे या स्थितीमध्ये काही लक्षणेही दिसून येतात. ही लक्षणे ओळखून तात्काळ उपचार सुरु करावेत. चला तर मग फॅटी लिव्हर ग्रेड 3 म्हणजे काय? त्याची लक्षणे काय असतात? याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...
दरम्यान, जेव्हा फॅटी लिव्हरची समस्या उद्धभवते तेव्हा लक्षणे सौम्य असतात, त्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही स्थिती फॅटीमध्ये ग्रेड 2 आणि ग्रेड 3 पर्यंत पोहोचते. ग्रेड 3 मध्येही लिव्हर सतत सिग्नल देते. ग्रेड 3 मध्ये लिव्हरवर 66 टक्क्यांहून अधिक फॅट जमा होते, ज्यामुळे लिव्हर त्याचे कार्य सुरळीतरित्या करु शकत नाही. गाझियाबादमधील वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अजय गुप्ता सांगतात, ही स्थिती जीवघेणी ठरु शकते.
फॅटी लिव्हर ग्रेड 3 मध्ये खूप थकवा जाणवतो. यासोबतच सतत अशक्तपणा जाणवतो. पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवते. कावीळसारखे आजार देखील उद्भवू शकतात. अचानक वजन कमी होणे आणि उलट्या झाल्यासारखे वाटणे ही त्याची लक्षणे आहेत. रक्तस्त्राव आणि पायांवर सूज येणे ही देखील फॅटी लिव्हर ग्रेड 3 ची लक्षणे आहेत. जास्त प्रमाणात फॅटयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास फॅटी लिव्हर ग्रेड 3 ची स्थिती उद्भवते.
डॉ. गुप्ता सांगतात, जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याकाळात तुम्ही तुमची जीवनशैली ताबडतोब बदलली पाहिजे. संतुलित आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे. जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्यास ताबडतोब सुरुवात करावी. फॅटी लिव्हर ग्रेड 3 वर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. मात्र या स्थितीत उपचार सुरु करण्यास विलंब झाला तर रुग्ण जीवही गमावू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.