Father's Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Father's Day 2022: 'फादर्स डे' का केला जातो साजरा, जाणून घेउया 'या' खास दिवसाचे महत्त्व

Father's Day Special News: 'फादर्स डे' सर्वात आधी 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता.

दैनिक गोमन्तक

'फादर्स डे' हा दिवस दरवर्षी 19 जून ला साजरा केला जातो. पण 'फादर्स डे' ची मूळ कल्पना आली कुठण हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. 'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी 'फादर्स डे' 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली. भारतातसुध्दा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. (father day 2022 know history singificance date importance)

'फादर्स डे' हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे जो आपल्या मुलांप्रती वडिलांचे असलेले प्रेम, आदर आणि तसेच त्यागाची आठवण करून देतो. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' हा दिवस साजरा करण्यात येतो.

* फादर्स डे 2022 चा इतिहास आणि महत्त्व

सर्वात आधी फादर्स डे 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. सोनोराची आई फार लवकर मरण पावली. त्यानंतर सोनोराने तिच्या वडिलांसोबत लहान भावंडांना वाढवले. सोनोराला वाटले की नवीन मान्यताप्राप्त मदर्स डे बद्दल चर्चचा प्रवचन ऐकताना वडिलांना ओळखीची गरज आहे. तिच्या वडिलांबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर दाखवून, तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला आणि त्यांना तिच्या वडिलांचा वाढदिवस, 5 जून हा फादर्स डे म्हणून ओळखण्यास सांगितले. मात्र, त्यांनी हा दिवस महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.

वर्षानुवर्षे, 'फादर्स डे' लोकप्रिय झाला आणि देशभरात साजरा केला गेला. त्यावेळचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार 'फादर्स डे' म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 जून हा 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.

जगाच्या अनेक भागांत 'फादर्स डे' ला सुट्टी दिली जाते. पण भारतात हा दिवस तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. पण या दिवशी आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT