Fashion Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: 'या' सिंपल टिप्स वापरा अन् जुन्या प्लेन ड्रेसला द्या डिझायनर लूक

जर तुमच्या जुना एखादा प्लेन ड्रेस असेल तर तुम्ही पुढील ट्रिक वापरून डिझानर लूक देऊ शकता.

Puja Bonkile

Fashion Tips: पारंपारिक कपड्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही. विशेषतः सूट नेहमीच फॅशन ट्रेंडचा एक भाग राहिला आहे. प्रत्येकाची स्वतःची आवड असते. काही लोकांना हेवी सूट घालायला आवडते तर काहींना प्लेन सूट घालायला आवडतो.

अनेकदा असे घडते की बाजारात सूटचे इतके प्रकार आहेत की आपले मन गोंधळून जाते. अशा परिस्थितीत आपण नवीन सूट खरेदी करतो आणि जुना प्लेन सूट घालत नाही.

तुमचा प्लेन सूट वॉर्डरोबच्या कोपऱ्यात पडलेला आहे का? तुम्ही तुमच्या प्लेन सूटला डिझायनर लुक देऊन पुन्हा वापरू शकता. यासाठी तुम्हाला पुढील टिप्स मदत करतील.

  • प्लेन ड्रेसला डिझायनर लूक कसा द्यायचा?

तुमचा प्लेन ड्रेस जूना आहे का? म्हणूनच तुम्ही ते घालत नसाल तर तुम्ही त्याला काही ट्रिक्स वापरून नवा लूक देऊ शकता. प्लेन सूटला डिझायनर लूक देण्यासाठी तुम्ही आरशा वापर करू शकता. मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे छोटे-मोठे आरसे मिळतील. फॅब्रिक ग्लूच्या मदतीने तुम्ही हे आरसे ड्रेसवर चिकटवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आरशाच्या साहाय्याने फुलांच्या डिझाईनसारखे कोणतेही डिझाइन बनवू शकता किंवा सूटच्या बॉर्डरवरच लावू शकता. तुमच्या प्लेन ड्रेसचे सौंदर्य दुप्पट करण्यासाठी, आरशाच्या बाजूला मोती देखील लावू शकता

  • प्लेन ड्रेसला खास लूक कसा द्यावा

प्लेन ड्रेसला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. ड्रेसच्या बॉर्डरला लेस लावू शकता. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि रंगांमध्ये आकर्षक लेस मिळतील. त्यांचा वापर करून तुमचा जुना प्लेन ड्रेस नवीन दिसेल. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास बॉर्डरवर लेस लावण्याऐवजी फक्त गळ्याला लेस लावून तुम्ही तुमचा सूट सुंदर बनवू शकता.

  • प्लेन ड्रेसला नवा लूक कसा द्याल

तुम्ही तुमचा प्लेन ड्रे नवीन दिसण्यासाठी डाय करू शकता. तुमचा आवडता रंग निवडून, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कोणत्याही डिझाईन किंवा प्रिंटमध्ये रंगवूनही घेऊ शकता. डायमध्ये डिझाईन बनवायला जास्त खर्च येतो.

  • प्लेन सूटला स्टाइल करण्यासाठी फॉलो करा पुढील टिप्स

प्लेन सूटमध्ये स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही त्याच्यासोबत कलरफुल ओढणी कॅरी करू शकता. फुल असणारी आणि बांधणी प्रिंटची ओढणी प्लेन ड्रेससोबत खूप छान दिसेल.

तुम्ही फक्त भारी दागिने घालून तुमच्या प्लेन ड्रेसला स्टायलिश लूक देऊ शकता. बाजारात तुम्हाला ऑक्सिडाइज्ड ते सोन्यापर्यंतचे सुंदर दागिने पाहायला मिळतील.

तुम्ही प्लेन ड्रेससोबत इतर कोणत्याही रंगाचा शरारा किंवा प्लाझो देखील घालू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT