Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Assembly Seats: नव्‍या सभापती निवडीसोबतच विधानसभेत आसनव्‍यवस्‍थेतही बदल करण्‍यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांना विधानसभेत ६ व्या क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे.
Ramesh Tawadkar, Govind Gaude
Ramesh Tawadkar, Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नव्‍या सभापती निवडीसोबतच विधानसभेत आसनव्‍यवस्‍थेतही बदल करण्‍यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांना विधानसभेत ६ व्या क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे.

सध्याच्या आमदारांत ते सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात त्यांचे नाव ११ व्या क्रमांकावर होते. त्यामुळे विधानसभेत ते कुठे बसतात, याविषयी कुतूहल होते. विधिमंडळ खात्याने त्यांची बैठक व्यवस्था क्र. ६ वर केली आहे. ५ क्रमांकावर रवी नाईक तर ७ व्या क्रमांकाचे आसन सुभाष शिरोडकर यांना देण्यात आले आहे.

आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांना विधानसभेत आसन क्र. ८ देण्यात आले आहे. याच जागी पूर्वी मंत्री गोविंद गावडे बसत असत. योगायोग म्हणजे गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर तवडकर यांना संधी मिळाली आहे.

गावडे यांना आसन क्र. १५ देण्यात आले आहे. तेही आज साध्या पेहरावात होते, तर तवडकर यांनी कुर्त्यावर जॅकेट परिधान केले होते. आसन क्र. १९ ते आसन क्र. १ विधानसभेत गणेश गावकर यांच्या आसनाचा क्रमांक १९ होता. आजही पॅन्ट-शर्ट अशा साध्या पेहरावात ते विधानसभेत आले होते.

गणेश गावकर यांची सभापतिपदी निवड झाल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना सभापतींच्या आसनाकडे नेले. विधानसभेत सभापतींच्या आसनाचा क्रमांक १ असतो. त्यामुळे गावकर यांनी आसन १९ ते १ असा प्रवास आज केला.

...अशी झाली सभापती निवड

विधानसभेच्या कामकाज सूचीवर आज तिसऱ्या क्रमांकावर सभापती पदाची निवडणूक होती. पिठासीन अधिकारी ज्योशुआ डिसोझा यांनी ११.३३ वाजता त्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारांची नावे वाचून दाखवली. त्यावेळी विरोधी गटातून एल्टन यांचे दोन अर्ज, तर सत्ताधाऱ्यांकडून गावकर यांचे पाच अर्ज सादर झाल्याचे समोर आले.

एल्टन यांच्या एका अर्जावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सूचक, तर वेन्झी व्हिएगस यांनी अनुमोदक म्हणून सही केली होती. दुसऱ्या अर्जावर कार्लुस फेरेरा यांनी सूचक, तर क्रुझ सिल्वा यांनी अनुमोदक म्हणून सही केली होती.

Ramesh Tawadkar, Govind Gaude
Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

गावकर यांच्या पहिल्या अर्जावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचक तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अनुमोदक म्हणून, दुसऱ्या अर्जावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सूचक तर दाजी साळकर अनुमोदक,

तिसऱ्या अर्जावर कृषिमंत्री रवी नाईक सूचक तर रुडॉल्फ फर्नांडिस अनुमोदक, चौथ्या अर्जावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात सूचक, तर उल्हास नाईक तुयेकर अनुमोदक, पाचव्या अर्जावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर सूचक, तर प्रवीण आर्लेकर अनुमोदक होते.

Ramesh Tawadkar, Govind Gaude
Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

यापैकी युरी आलेमाव यांचा ठराव पहिल्यांदा मतदानाला टाकण्यात आला. तो ७ विरुद्ध ३२ मतांनी नामंजूर झाल्याचे सभापती डिसोझा यांनी जाहीर केले. त्याचबरोबर गावकर हे सभापतिपदी निवडून आल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्याला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आक्षेप घेतला. आलेमाव यांनी गावकर यांची सभापतिपदी निवड व्हावी, हा ठरावच चर्चेला आला नसल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर सभापतींनी मुख्यमंत्र्यांना ठराव मांडायला सांगितले. त्यांनी ठराव मांडल्यावर खंवटे यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यावर झालेल्या मतदानानंतर तो ३२ विरुद्ध ७ मतांनी मंजूर झाला आणि गावकर हे सभापतिपदी निवडून आल्याचे सभापती डिसोझा यांना जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com