Barbecue Grill झटक्यात घरीच करा स्वच्छ,फक्त वापरा 'ही' ट्रिक

तुम्हाला जर बार्बिक्यु ग्रील स्वच्छ करायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Barbecue Grill
Barbecue Grill Dainik Gomantak
Published on
Updated on

Barbecue Grill: पनीर टिक्का ते सोया टिक्का किंवा चिकन टिक्का पर्यंत अनेक पदार्थ बनवण्यासाठी बार्बेक्यू ग्रिलचा वापर केला जातो. बार्बेक्यू ग्रिल वापरून मशरूम टिक्का किंवा तंदूरी पनीर टिक्का बनवणे सोपे आहे. परंतु जर तुम्ही त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर त्यावर गंज चढतो आणि नंतर काळे पडतात. यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी काय वापरावे हे जाणून घेऊया.

  • बेकिंग सोड्याचा कसा कराल वापर

तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी किंवा कपड्यांवरील डाग साफ करण्यासाठी एकदा नव्हे तर अनेक वेळा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून बार्बेक्यू ग्रिल देखील साफ करू शकता.

सर्वात पहिले 1/2 लिटर पाण्यात 2-3 चमचे बेकिंग सोडा मिक्स करावा.

नंतर त्यात 1 चमचा मीठ किंवा लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा आणि मिश्रण कोमट ठेवावे.

यानंतर, मिश्रण ग्रीलवर पूर्णपणे स्प्रे करावे.

नंतर 5 मिनिटांनंतर क्लिनिंग ब्रशने घासून घ्या.

  • बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साइड

हायड्रोजन पेरोक्साईड ही अशी गोष्ट आहे की ज्याचा वापर करून तुम्ही कीतीही घाण वस्तु स्वच्छ करू शकता. तुम्ही कमी वेळात वस्तु चमकवू शकता. हायड्रोजन पेरोक्साइड आणि बेकिंग सोडा वापरल्याने तुमची बार्बेक्यू ग्रिल अगदी नवीन दिसेल.

सर्वात पहिले एका भांड्यात 3-4 चमचे बेकिंग सोडा टाकावे.

आता त्यात 2-3 चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड द्रव टाकून घट्ट मिश्रण तयार करा.

यानंतर मिश्रण ग्रिलवर लावा आणि 5 मिनिटे राहू द्या.

5 मिनिटांनंतर क्लिनिंग ब्रश किंवा सॅंडपेपरने घासून स्वच्छ करा.

टीप: मुलांपासून हायड्रोजन पेरॉक्साइड दूर ठेवा.

Barbecue Grill
Reuse Tips: जुना अन् तुटलेल्या पेन्सिल बॉक्सचा असा करा घरगुती कामांसाठी वापर
  • व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

सध्या बरेच लोक पदार्थ चवदार बनवण्यासाठी किंवा टाइल,कपड्यांवरील डाग काढण्यासाठी व्हिनेगरचा वापर करतात. तसेच तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून बार्बेक्यू ग्रिल स्वच्छ करू शकता. यासाठी पुढील पद्धतींचा वापर करावा.

  • सर्वात पहिले बार्बेक्यू ग्रिलवर 2-3 चमचे व्हिनेगर टाकावे.

  • 3 मिनिटांनंतर बार्बेक्यू ग्रिलमध्ये बेकिंग सोडा टाकावा.

  • 5 मिनिटांनंतर पाण्याचे काही थेंब टाकावे आणि स्वच्छ ब्रशने घासून घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com