Skin Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: Retinol चा स्किन केअरमध्ये समावेश करण्यापुर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

रेटिनॉचा स्किनकेअरमध्ये त्याचा समावेश करून बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करता येते. पण जर तुम्हाला ग्लोइंग आणि तरुण त्वचा हवी असेल तर त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.

Puja Bonkile

Skin Care Tips: वृद्धत्वामुळे त्वचेचा रंग आणि चमक कमी होते. यासाठी अनेक स्किन केअर रुटीन ट्रेंडमध्ये आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. या स्किनकेअर घटकांपैकी एक म्हणजे रेटिनॉल. यामध्ये व्हिटॅमिन ए यामध्ये आढळते, जे बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. मुरुमांवर उपचार असो किंवा सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसान असो, रेटिनॉल तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेऊ शकते. मात्र, त्याच्या गैरवापरामुळे त्वचेला काही धोकाही निर्माण होतो. यामुळे ते वापरताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

अतिवापर करणे

जर तुम्ही याचा स्किनकेअर रूटिनमध्ये समावेश करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला ते कमी प्रमाणात लावावे. त्वचेवर चाचणी करण्यासाठी, 0.1% ते 0.2% च्या कॉन्सेंट्रेशनने सुरूवात करा. तुमच्‍या त्वचेवर ते कसे रिअ‍ॅक्ट करत आहे हे जाणून घेण्‍यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा याचा वापर करू शकता. लक्षात ठेवा, जर तुम्ही संवेदनशील त्वचेच्या श्रेणीतून येत असाल तर ते वापरण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सनस्क्रीन लावणे

जर तुम्ही स्किनकेअरम रूटिनमध्ये रेटिनॉल वापरत असाल तर दररोज सनस्क्रीन लावावे. ते तुमची त्वचा सूर्यासाठी अधिक संवेदनशील बनवू शकत असल्याने, किमान 30 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे. हे तुमच्या चेहऱ्याला सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान टाळेल.

पॅच टेस्ट करावी

रेटिनॉलचा प्रभाव जोरदार आहे. हे प्रत्येकाच्या त्वचेला सुट होत नाही. म्हणून ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मानेवर किंवा कानाच्या खाली रेटिनॉल आधारित सीरम किंवा क्रीम लावु शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेवर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊ शकाल. जर तुम्हाला लालसरपणा किंवा खाज सुटत असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर अजिबात वापरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT