Family Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Family Relationship: कुटुंबाला 'वडासारखं मजबूत ठेवायचे असेल तर 'या' गोष्टी टाळा, अन् या गोष्टी आवर्जून करा

कुटुंबाला वडासारखं मजबूत ठेवायचे असेल तर काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Family Relationship: घराला घरपण हे सदस्यांमध्ये आपुलकी, प्रेम आणि जवळीक असेल तर येते. पण जर या गोष्टी नसेल तर घरातील वातावरण आनंदी राहत नाही. जगात घर हे असे ठिकाण आहे जिथे गेल्यावर आपण सर्व थकवा विसरून जातो. अशा घराला आनंदी आणि वडासारखे मजबुत ठेवायचे असेल तर पुढिल गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1) ऑफिसचे काम घरी आणु नका

तुम्ही जर नोकरी करत असाल तर ऑफिसमधील काम घरी आणू नका. घरी आल्यावर कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यावा. यामुळे एकमेकांमध्ये आपुलकी वाढते.

2) घरातील सदस्यांची कौतुक करावे

जर कुटुंबातील एखाद्या सदस्यांने चांगले काम केले तर त्याचे कौतुक नक्की करावे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच तसेच त्यांना आनंद देखील होतो. यामुळे घरातील सदस्यांचे कौतुक करावे.

3) सोबत जेवण

घरातील सदस्यांमध्ये आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवायचा असेल तर सोबत जेवण करावे. तुम्हाला सकाळी घाई असल्यामुळे जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी एकत्र बसुण जेवण करू शकता.

4) सुट्टीच्या दिवशी ट्रिप प्लॅन करा

तुम्ही सुट्टीच्या दिवशी फॅमिली ट्रीप प्लॅन करू शकता. यामुळे तुमचा सुट्टींचा दिवस चांगला जाईल तसेच एकमेकांसोबत गोष्टी शेअर करता येईल. १

5) कठिण काळात मदत करावी

घरातील एखाद्या सदस्य कोणत्याही अडचणीत असेल तर त्याला मदत करावी. यामुळे तुमच्यामध्ये आपुलकी वाढेल. तसेच घरात आनंद देखील टिकुन राहिल.

6) आदर करावा

घरातील प्रत्येक सदस्यांचा आदर करावा. एकमेकांचा आदर केला नाही तर मतभेद निर्माण होऊ शकतात. यामुळे घरातील सदस्यांच्या भावनांचा आदर करणे महत्वाचे आहे. तसेच यामुळे घरात आनंदी वातावरण राहते.

7) सण-उत्साह सोबत साजरे करावे

तुम्ही कामानिमित्त घरा बाहेर राहत असाल तर सण-उत्साह एकत्र कुटुंबातसोबत साजरे करा. कारण यामुळे लहान मुलांना सणांची माहिती मिळेल आणि एकत्र राहण्याचे महत्व समजेल.

8) कोणतेही मत सदस्यांवर लादू नये

घरातील सदस्यांवर कोणतेही मत किंवा निर्णय लादू नका. एकमेकांच्या मतांचा आदर करावा. यामुळे घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण टिकुन राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT