Eye Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Eye Cancer: डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना, दिसण्यात बदल? कर्करोगाचा असू शकतो इशारा; जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Symptoms Of Eye Cancer: देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्यापैकी एक डोळ्यांचाही कर्करोग आहे. होय, चकीत झालात ना... इतर कर्करोगांप्रमाणे त्याचीही लक्षणे आहेत आणि ती लवकर ओळखणे गरजेचे ठरते.

Manish Jadhav

देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. ज्यापैकी एक डोळ्यांचाही कर्करोग आहे. होय, चकीत झालात ना... इतर कर्करोगांप्रमाणे त्याचीही लक्षणे आहेत आणि ती लवकर ओळखणे गरजेचे ठरते. चला तर मग डोळ्यांच्या कर्करोगाची कारणे आणि त्याची लक्षणे काय आहेत? डोळ्यांचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरु शकतो का? यासाठी कोणते उपचार आहेत? याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...

डोळ्यांचा कर्करोग (Cancer) हा दुर्मिळ कर्करोगाच्या श्रेणीत येतो. डोळ्यात अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. यामध्ये डोळ्याची बाहुली आणि त्याच्या सभोवतालच्या रचनांचा समावेश आहे. त्याची सुरुवात डोळ्यांतील ट्यूमरपासून होते.

डोळ्यात निर्माण होणारे सर्व ट्यूमर कर्करोगाचे नसले तरी, त्यांची तपासणी करणे गरजेचे ठरते. जर डोळ्यांच्या कर्करोगावर वेळेवर उपचार केले नाहीत तर तो संपूर्ण शरीरात पसरु शकतो. म्हणून, जर डोळ्यांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेतल्यास कर्करोगास रोखता येते. डोळ्यांच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने त्याचा प्रसार रोखता येतो.

डोळ्यांच्या कर्करोगाचे प्रकार आणि लक्षणे

ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. ऋषी गुप्ता सांगतात, डोळ्यांच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये आयरीस मेलेनोमाचा समावेश आहे, जो डोळ्याच्या रंगीत भागात किंवा आयरीसमध्ये होतो. सिलीरी बॉडी मेलेनोमा, जो डोळ्याच्या लेन्सला समायोजित करणाऱ्या स्नायूंमध्ये होतो. कोरोइडल मेलेनोमा, जो डोळ्याच्या बुबुळामध्ये होतो. या तिन्हींमध्ये सुरुवातीची लक्षणे देखील दिसून येतात. यामध्ये दृष्टी कमकुवत होणे आणि अंधुक दृष्टी यांचा समावेश आहे. डोळ्यांमध्ये प्रकाशाचे ठिपके किंवा चमक दिसणे आणि जळजळ होणे ही लक्षणे आहेत. सुरुवातीची लक्षणे दिसताच चाचणी आणि उपचार केले पाहिजेत.

स्वतःचे रक्षण कसे करावे

डोळ्यांची स्वच्छता आणि संरक्षणाची काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांत थेट सूर्यप्रकाश येऊ देऊ नका. यासाठी तुम्ही यूव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस वापरु शकता. जास्त काळ सूर्यप्रकाश, धूळ आणि वायू प्रदूषणाच्या (Air Pollution) संपर्कात राहणे टाळा. तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती तपासून घ्या. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला डोळ्यांचा कर्करोग झाला असेल तर नियमित तपासणी करत राहा. तथापि, भारतात डोळ्यांचा कर्करोग खूपच दुर्मिळ आहे आणि त्याचे प्रमाण 1 पेक्षा कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT