office Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Office मध्ये बसून सुस्तावले असाल तर करा 'हे' सिंपल योगा

Yoga Tips: ऑफिसमध्ये तासनतास डेस्कवर बसून तुम्हाला पाठ आणि मान दुखण्याचा त्रास होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम उपाय घेऊन आलो आहोत.

दैनिक गोमन्तक

ऑफिसमध्ये तासनंतास एकाच जागी बसून. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करणं कधीकधी खूप थकवणारे असते. इतकेच नाही तर तासंनतास एकाच पोजीशनमध्ये बसल्यामुळे शरीरीक समस्या, शरीर आखडणे आणि मानसिक ताण वाढण्याच्या समस्या वाढु शकतात. यामुळे अनेक आजार उद्भवु शकतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी (Health) योगा किंवा व्यायाम करणे फायदेशीर असते.

ऑफिसमध्ये (Office) तुमच्या टेबल आणि खुर्चीसमोर बसूनही तुम्ही हे सिंपल योगा करू शकता. अकडलेल्या शरीराला आराम देऊ शकता. जर तुमच्या पाठ, हात आणि मानेवर ताण जाणवत असेल किंवा तासनतास बसल्यामुळे हाडांमध्ये दुखत असेल तर तुम्ही तुमची खुर्ची थोडी मागे खेचून शरीर थोडे स्ट्रेच केले पाहिजे.

तुम्ही ऑफिसमध्ये पाठदुखी आणि तणावापासून (Stress) सुटका मिळवण्यासाठी ताठर शरीर आणि मानसिक तणावातून सुटका हवी असेल तर पाठीचा कणा हलवा.

* अशा प्रकारे मूव्ह करा पाठीचा कणा

- सर्वात पहिले आपल्या खुर्चीवर सरळ बसा आणि तळपाय जमिनीवर व्यवस्थित टेकवा.

- आता तुमचे हात वरच्या दिशेने नेऊन इंटरलॉक करा आणि वरच्या दिशेला स्ट्रेच करा. थोडा वेळ याच पोजीशनमध्ये राहा.

- आता इंटरलॉक केलेले हात समोरच्या दिशेला न्या आणि ते समोर स्ट्रेच करत पाठ गोलाकार करत मागच्या बाजूला थोडी खेचा.

- आता दोन्ही हात मोकळे करा आणि मागच्या दिशेला पसरावा. मान वरच्या बाजूला स्ट्रेच करा आणि पाठ मागे खेचा.

- आता दोन्ही तळहात डेस्कवर पुढे ठेवा, खाली जमिनीकडे पाहात डोके खाली न्या आणि पाठीचा कणा सरळ स्ट्रेच करा.

- हा योगा दिवसातून एक किंवा दोनदा केल्याने तुमचे शरीर जास्त रखडणार नाही आणि अकडल्यास तुम्हाला त्या त्रासापासून आराम मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT