Women Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women Health: महिलांनो, तुमच्या पोटाचे विकार हलक्यात घेऊ नका! असू शकते 'या' गंभीर आजाराची सुरुवात

Women's Health Issues: महिला त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे कधीकधी गांभीर्याने पाहत नाही. त्यांना एंडोमेट्रिओसिस नावाचा जीवघेणा आजारही असू शकतो.

Manish Jadhav

Endometriosis Symptoms: महिला त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे कधीकधी गांभीर्याने पाहत नाही. त्यांना एंडोमेट्रिओसिस नावाचा जीवघेणा आजार असू शकतो, ज्याची लक्षणे सुरुवातीला खूप सामान्य दिसतात. एंडोमेट्रिओसिस हा महिलांच्या गर्भाशयाशी संबंधित एक आजार आहे. जर एखाद्या महिलेने त्यावर तात्काळ उपचार केले नाहीत तर तिला प्रजनन समस्या आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता उद्भवू शकते. या आजाराची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे गॅस, अपचन, आम्लता, जी पचनाशी संबंधित आहेत. चला तर मग या आजाराबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

एंडोमेट्रिओसिस हा एक आजार आहे, जो महिलांना (Women) प्रभावित करतो. हा आजार अंडाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा पोट आणि आतड्यांमधील आतील भागांमध्ये टिशूंच्या वाढीमुळे होतो. या आजारात दर महिन्याला जेव्हा एखाद्या महिलेला मासिक पाळी येते तेव्हा गर्भाशयाचा आतील भाग तुटतो, ज्यामुळे रक्त येऊ लागते. एंडोमेट्रिओसिसमुळे वाढणाऱ्या टिशूंमुळे मासिक पाळी दरम्यान सूज आणि रक्तस्त्राव होतो. एंडोमेट्रिओसिसमुळे पोटात सूज, गाठी आणि तीव्र वेदना होतात.

एंडोमेट्रिओसिसची लक्षणे

जर एखाद्या महिलेला वारंवार पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. बऱ्याचदा महिला या समस्यांकडे गॅसची समस्या म्हणून पाहतात. त्याची काही लक्षणे आहेत.

पेल्विक पेन- मासिक पाळी दरम्यान किंवा त्याभोवती खालच्या ओटीपोटात नेहमीपेक्षा जास्त वेदना होतात.

संभोगदरम्यान किंवा नंतर या भागात वेदना होतात.

अनियमित किंवा जास्त मासिक पाळी.

काही महिलांना गर्भधारणा होण्यास समस्या येतात.

थकवा आणि अशक्तपणा.

पाठदुखी आणि लघवीची समस्या.

उपचार काय आहेत?

फरिदाबादच्या प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता मेंदीरट्टा सांगतात, एंडोमेट्रिओसिसवर कायमस्वरुपी असा उपचार नाहीत. यासाठी त्याची लक्षणे ओळखून जीवनशैलीत बदल करावा. हा त्याचा योग्य उपचार आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात.

टिश्यू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

जीवनशैलीत (Lifestyle) बदल करावा.

हार्मोनथेरपी घेतली जाऊ शकते.

याशिवाय, महिलांनी योग्य आहार घ्यावा, व्यायाम करावा, मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या सवयी टाळाव्यात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात, बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT