VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

goa benaulim beach dolphin video: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक आणि स्थानिकांसाठी आकर्षण ठरणारा एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला आहे.
goa benaulim beach dolphin video
goa benaulim beach dolphin videoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बाणावली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक आणि स्थानिकांसाठी आकर्षण ठरणारा एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला आहे. सध्या गोव्यात काही विशेष पाहुण्यांनी हजेरी लावली असून हे पाहुणे म्हणजे चक्क समुद्रातील डॉल्फिन आहेत. या डॉल्फिनचा एक अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटांमध्ये मुक्तपणे खेळणाऱ्या या डॉल्फिन्सचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.

हा व्हिडिओ मच्छीमार पेले यांनी शेअर केला असून, व्हिडिओमध्ये काही डॉल्फिन खेळताना, उड्या मारताना आणि समुद्राच्या पाण्यात मुक्तपणे पोहताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांनी "हे दृश्य म्हणजे निसर्गाचं अप्रतिम देणं आहे" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

goa benaulim beach dolphin video
Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी तो पुन्हा पुन्हा शेअर केला आहे. पर्यटकांना यावेळी गोव्याच्या समुद्रात डॉल्फिन पाहण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही.

प्राणी आणि पक्ष्यांच्या जगातही भावना असतात. ते आनंदी, उत्साही आणि कधी कधी खेळकरही असतात. डॉल्फिन हे समुद्रातील सर्वात बुद्धिमान आणि मित्रत्वपूर्ण प्राणी मानले जातात. ते गटाने फिरतात.

goa benaulim beach dolphin video
Goa Theft: वाढत्या घरफोड्या! कोलवा पोलिस तपासासाठी उत्तरप्रदेशात; लवकरच संशयित जाळ्यात सापडण्याची शक्‍यता

गोव्यात डॉल्फिन दिसणं हे पर्यावरणीय दृष्टीने सकारात्मक संकेत आहे. स्वच्छ पाणी, योग्य तापमान आणि खाद्यसाखळीचं संतुलन असल्यास डॉल्फिन या भागात वारंवार दिसतात.

एकूणच, गोव्याच्या समुद्रात दाखल झालेल्या या "समुद्रातील पाहुण्यामुळे" सोशल मीडियावर उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. डॉ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com