Egg Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Eggs For Diabetes: डायबिटिस असलेल्या लोकांनी अंडी खावीत की नाही? वाचा सविस्तर

Eggs For Diabetes: अमेरिकन डायबिटीज असोसिएशन आणि इतर आरोग्य संस्थांच्या मते मर्यादित प्रमाणात अंडी खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.

Puja Bonkile

Eggs For Diabetes: मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्याचा जगभरातील लाखो लोकांना त्रास होतो. या आजारावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर तो मृत्यूचे कारणही बनू शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांना विशेषतः गोड खाण्यास मनाई आहे. साखरेचे बहुतांश रुग्ण अंडी खाताना दिसतात. असे म्हटले जाते की अंड्यांमध्ये 10 पैकी 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात, जे चांगले आरोग्य राखण्यासाठी काम करतात.  

अंड्यांमध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी12, बी6, कॅल्शियम, फोलेट, रिबोफ्लेविन, जस्त आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

अनेक पोषक तत्वांमुळे, अंडी बहुतेक लोक खातात, अगदी मधुमेही रुग्णही. आता मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावीत की नाही असा प्रश्न पडतो.

  • साखरेचे रुग्ण अंडी खाऊ शकतात का?

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

अभ्यासावर विश्वास ठेवला तर, नैसर्गिक प्रथिने पुरेशा प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. 

अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरी. काही अभ्यासानुसार आहारातील कोलेस्टेरॉलचा लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर फारसा प्रभाव पडत नाही.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन आणि इतर आरोग्य संस्थांच्या मते, मर्यादित प्रमाणात अंडी खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.

  • जास्त प्रमाणात सेवन करू नका

मधुमेहाचे रुग्ण अंडी खाऊ शकतात असा निष्कर्ष निघतो. कारण त्यात कर्बोदके कमी प्रमाणात असतात आणि जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने जास्त प्रमाणात असतात.

पण अशा लोकांनी याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT