Sunday Tips| Hair Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sunday Tips: निरोगी केसांसाठी अंडे का फंडा! 'असा' बनवा हेअर मास्क

केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अंडी फायदेशीर ठरतात.

दैनिक गोमन्तक

Sunday Tips: आरोग्यासह केसांची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्ही हा घरगुती उपा. केल्यास तुमचे केस चमकदार होईल.

यासाठी तुम्हाला अंड्यापासून बनवलेला मास्क वापरावा लागेल. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. केस निरोगी ठेवण्यास मदत करते. केसांना मुळांपासून पोषण देण्याचे काम करते. केसांमधील ड्रायपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. आपण केसांसाठी अंडी कोणत्या प्रकारे वापरू शकता हे जाणून घेउया.

  • अंडी, खोबरेल तेल आणि कोरफड

सर्वात पहिले एलोवेरा जेल एका भांड्यात घ्यावे. त्यात अर्धा चमचा खोबरेल तेल टाकावे. त्यात एक अंडे फोडून टाकावे. या सर्व गोष्टी नीट मिक्स करा. ते केस आणि टाळूवर लावावे. 30 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

  • अंडी, ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे दूध

एका भांड्यात एक अंडे घ्या. त्यात 2 चमचे नारळाचे दूध मिक्स करावे. या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे फेटुन घ्या. हा मास्क केसांमध्ये चांगले लावावे. तासभर केसांवर राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवावे. तुम्ही आठवड्यातून एकदा ते दोनदा वापरू शकता.

egg
  • अंड्याचा हेअर मास्क

एका भांड्यात दोन अंडी घ्यावी. चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केस (Hair) आणि टाळूला लावा. 30 ते 45 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवावे. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. आपण हा मास्क आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

  • अंडी आणि दही हेअर मास्क

एका भाड्यात एक अंडे फोडुन घ्यावे. त्यात 2 ते 3 चमचे दही घालावे. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. हे टाळूवर तसेच केसांना लावावे. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

SCROLL FOR NEXT