Green Chilli Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Green Chilli: हिरवी मिरची खाल्ल्याने खरचं हृदयविकाराचा धोका कमी होतो का? जाणून घ्या

Green Chilies And Heart Health: हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) राखण्यास मदत करते.

Manish Jadhav

हिरव्या मिरची खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हिरव्या मरचीत पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. तसेच, हिरव्या मिरच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय, त्यात "कॅप्सेसिन" नावाचा एक विशेष घटक असतो. हा घटक आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरु शकते.

अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, हिरव्या मिरच्यांमध्ये असलेले कॅप्सेसिन हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) राखण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते रक्त परिसंचरण सुधारते आणि रक्तवाहिन्यांमधील फॅटचे प्रमाण कमी करण्यास मदत करु शकते. यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय, हिरव्या मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील जळजळ कमी करतात. जळजळ हे हृदयरोगांचे एक प्रमुख कारण मानले जाते.

जास्त हिरवी मिरची खाणे हानिकारक

हिरव्या मिरच्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरु शकते, परंतु हृदयविकाराचा धोका थेट कमी करण्यासाठी हा जादूई उपाय नाही. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे. तथापि, जास्त खाणे हानिकारक असू शकते. जास्त मिरच्या खाल्ल्याने पोटात जळजळ, आम्लता किंवा अल्सर होऊ शकतो. म्हणून, संतुलित प्रमाणात हिरवी मिरची खाणे फायदेशीर ठरते.

कर्करोगाशी लढण्यासाठी उपयुक्त

हिरवी मिरची केवळ हृदयाशी संबंधित समस्यांशी लढण्यासाठीच नाही तर कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करण्याचे काम करतात. फ्री रेडिकल्स हा हानिकारक घटक आहे, जो पेशींना नुकसान पोहोचवून कर्करोगास कारणीभूत ठरु शकतात. हिरव्या मिरच्यांमध्ये आढळणारे कॅप्सेसिन काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकते. त्याचे फायदे विशेषतः प्रोस्टेट, पोट आणि फुफ्फुसांच्या कर्करोगात (Cancer) दिसून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT