Brain Tumor Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brain Tumor: ब्रेन ट्युमरची सुरुवातीला दिसतात 'ही' लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात; वेळीच घ्या उपचार

Early Signs Of Brain Tumor: ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार आहे. कधीकधी सामान्य दिसणारी गाठ मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ असू शकते. मेंदूतील ट्यूमर खूप उशिरा माहिती पडतो. ब्रेन ट्यूमर झाल्यावर सुरुवातीला काही लक्षणे दिसतात.

Manish Jadhav

ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार आहे. कधीकधी सामान्य दिसणारी गाठ मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ असू शकते. मेंदूतील ट्यूमर खूप उशिरा माहिती पडतो. ब्रेन ट्यूमर झाल्यावर सुरुवातीला काही लक्षणे दिसतात. तथापि, ही लक्षणे खूपच सौम्य असतात, ज्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे कोणती दिसतात आणि ती कशी ओळखावी? याबाबत जाणून घेऊया...

भारतात (India) दरवर्षी 50 हजारांहून अधिक लोकांना ब्रेन ट्यूमर असल्याचे आढळून येते. यापैकी 20 टक्के मुले आहेत. ब्रेन ट्यूमरची मुख्य कारणे म्हणजे पर्यावरणीय बदल, रसायने, विषारी पदार्थांचे सेवन आणि अनुवांशिक इत्यादी असू शकतात. ब्रेन ट्यूमरची अगदी सुरुवातीलाच काही लक्षणे दिसून येतात, जी ओळखणे गरजेचे असते. ही लक्षणे ओळखून तात्काळ उपचार घेतल्यास मोठा धोका टाळू शकतो. पण जेव्हा ब्रेन ट्यूमर पसरतो तेव्हा उपचार करणे देखील कठीण होते. कधीकधी, त्यावर कोणताही इलाज नसतो.

सुरुवातीची लक्षणे

ब्रेन ट्यूमरची सुरुवातीला काही प्रमुख लक्षणे दिसतात. पिडित व्यक्तीची दृष्टी धूसर होते. याशिवाय, स्मरणशक्तीवर परिणाम, अचानक बेशुद्ध होणे, बोलताना चाचपडणे, अशक्तपणा, चालताना आणि काही काम करताना त्रास जाणवणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे, यामध्ये मूड स्विंग आणि राग यांचा समावेश असू शकतो. यासोबतच कानात सतत आवाज घूमत राहणे. ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे असू शकतात.

डॉक्टरांशी संपर्क साधा

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधा. जर लवकर निदान झाल्यानंतर उपचार सुरु केले तर ब्रेन ट्यूमरमधून बरे होण्याची शक्यता जास्त असते. ब्रेन ट्यूमर जसजसा पसरतो आणि त्याचा आकार वाढतो तसतसे बरे होण्याची शक्यता देखील कमी होते. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT