Causes of Brain Tumor: काय सांगता? तुमच्या रोजच्या आयुष्यातील या गोष्टी ठरू शकतात ब्रेन ट्यूमरचे कारण; एकदा वाचाच

ब्रेन ट्यूमर हा एक धोकादायक आजार आहे, ज्याबद्दल नेहमीच कर्करोगाची भीती असते.
Brain Tumor Causes
Brain Tumor CausesDainik Gomantak
Published on
Updated on

Causes of Brain Tumor: ब्रेन ट्यूमर हा एक धोकादायक आजार आहे, ज्याबद्दल नेहमीच कर्करोगाची भीती असते. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील पेशींची असामान्य वाढ.

सर्व ब्रेन ट्यूमर कर्करोग नसतात. ब्रेन ट्यूमरमध्ये, पेशी असामान्य पद्धतीने वाढत राहतात, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मेंदूतील गाठीमुळे इतरही अनेक आजार शरीरात जन्म घेऊ शकतात, जसे की बोलण्यात अडचण येणे, पक्षाघात इ. या आजाराच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखीसह चक्कर येते.

यासोबतच थकवा, मळमळ, उलट्या, ऐकण्यात-बोलण्यात समस्या, हात-पाय सुन्न होणे, अंधुक दिसणे इत्यादीही या आजाराची लक्षणे आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बर्‍याच वेळा असे दिसून आले आहे की, काही लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तथापि, काही लोकांमध्ये अनेक धोकादायक लक्षणे दिसतात.

ब्रेन ट्यूमरची काही लक्षणे आहेत ज्यांना आपण किरकोळ समस्या समजतो. चला त्या धोकादायक घटकांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे ब्रेन ट्यूमर रोगाचा धोका उद्भवू शकतो.

Brain Tumor Causes
Daily Horoscope 27 April: 'या' लोकांना ऑफिसमध्ये होणार त्रास; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

ब्रेन ट्यूमर होण्यामागील कारणे:

1. मोबाईलचा सतत वापर

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोनचा वापर आणि मानवामध्ये ब्रेन ट्यूमर विकसित होण्यामध्ये एक संबंध आहे, ज्याचे पुरावे देखील अस्तित्वात आहेत.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, मोबाईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात, जे मानवांसाठी कर्करोगजन्य आहे; म्हणजेच कर्करोगास कारणीभूत आहे.

तज्ञांनी शिफारस केली आहे की तुम्ही हँड्सफ्री, वायरलेस डिव्हाइसेस जसे की हेडफोन किंवा स्पीकरवर फोन वापरावा. मोबाईलपासून जेवढे शक्य असेल तेवढेच अंतर ठेवा.

2. रासायनिक पदार्थांच्या संपर्कात असणे

प्रत्येकाने कीटकनाशके, रबर किंवा विनाइल क्लोराईड, तेल उत्पादने आणि इतर औद्योगिक संयुगे यांसारख्या रासायनिक पदार्थांशी वारंवार संपर्क टाळावा. कारण त्यांच्या संपर्कात आल्याने ब्रेन ट्युमरचा धोका निर्माण होऊ शकतो.

3. उच्च संतृप्त चरबी असलेले अन्न

जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले अन्नपदार्थ जास्त खाल्ल्याने ब्रेन ट्यूमरचा धोकाही होऊ शकतो. बर्‍याच अभ्यासांनुसार, खराब अन्न आहाराव्यतिरिक्त, खराब दिनचर्या आणि जीवनशैली जसे की धूम्रपान करणे किंवा व्यायाम न करणे देखील ब्रेन ट्यूमरचा धोका वाढवू शकतो.

4. वाढते वय

ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो आणि जसजशी एखादी व्यक्ती मोठी होते, ब्रेन ट्यूमरसह अनेक कर्करोगांचा धोका देखील वाढतो. 85 ते 89 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये ब्रेन ट्युमरचा धोका सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. मात्र, सामान्य माणसाला याचा त्रास होऊ शकत नाही, असे नाही.

5. हार्मोन्समधील असंतुलन

डॉक्टर म्हणतात की हार्मोन्समधील असंतुलन देखील ब्रेन ट्यूमरच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकते. ज्या महिला दीर्घकाळ हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात त्यांना त्याचा धोका अधिक असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com