Dussehra 2021: Dont forget take these measures save money home  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dussehra: घरात पैसा टिकून राहण्यासाठी हे उपाय करायला विसरू नका

आज संपूर्ण देशात दसरा साजरा केला जात आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

देवी लक्ष्मी धनाची देवी मानली जाते. असे म्हणतात की ज्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्या घरात संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. दुर्दैव सुद्धा सौभाग्यमध्ये बदलते आणि घरात सुख-शांती नांदते. प्रभू श्री रामाने लंकापती रावणाचा वध केला होता, तसेच माॅं दुर्गाने महिषासुरांचा वध केला होता. या कारणांमुळेच दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस मानला जातो. जर तुमच्या घरात काही समस्या असतील तर पुढील उपाय करायला विसरू नका.

* पैशाचे संकट दूर करण्यासाठी

माॅं लक्ष्मीला लाल रंग आणि शृंगार आवडते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जाणून, लाल वस्त्र अर्पण करावे. यासोबतच शृंगारचे सामान अर्पण करावे. भगवान विष्णूला पिवळे कपडे अर्पण करावे. यानंतर लक्ष्मी नारायणाचे पठन करावे आणि खीर अर्पण करावी. यानंतर दुख दूर करण्यासाठी माॅं लक्ष्मीला प्रार्थना करावी. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

* दुर्दैव दूर करण्यासाठी

तुम्ही जर कठोर परिश्रम करत असाल पण अपेक्षित यश मिळत नसेल, तर दसऱ्याच्या दिवशी लाल सूती कापड घ्या आणि त्यात नारळ ठेवावा. देवी लक्ष्मी आणि नारायण यांचे स्मरण करून या नारळाला सात वेळा तुमची इच्छा व्यक्त करावी आणि ते पाण्यात सोडून द्यावे. असे केल्याने आपले दुर्दैव देखील दूर होईल.

* गरीबी दूर करण्यासाठी

दसऱ्याच्या दिवशी घरच्या ईशान्य कोपऱ्यात चंदन, कुमकुम आणि फुलांनी अष्टकोनी कमळाचा आकार बनवा आणि जया आणि विजयाचे स्मरण करून त्याची पूजा करा. यानंतर शमीच्या झाडाची पूजा करावी आणि झाडापासून थोडी माती घेवून आपल्या घरात ठेवावी. असे मानले जाते की यामुळे घरातील गरीबी दूर होऊन घरातील सदस्यांची प्रगती होण्यास सुरुवात होते.

* आजार दूर ठेवण्यासाठी

दसऱ्याच्या दिवशी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठन करावे. हनुमाणजी नारायण आणि माता लक्ष्मीचे भक्त आहेत. त्यामुळे तीनची पूजा केल्याने नारायण आणि माॅं लक्ष्मीचेही आशीर्वाद मिळतात. यानंतर आजारी व्यक्तीवरून नारळ 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीत फेकून द्यावे. असे मानले जाते की आजारी व्यक्ती लवकर बरा होतो. तसेच घरातील सर्व व्यक्तीवरुण नारळ ओवाळून टाकल्यास सर्वांचे आरोग चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT