गोव्यात मेईस्नेर तंत्रावर आधारित नाट्य कार्यशाळा  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यात मेईस्नेर तंत्रावर आधारित नाट्य कार्यशाळा

काणकोण (Canacona) येथे होणारी ही कार्यशाळा सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि अभिनय प्रशिक्षक सॅनफोर्ड मेईस्नेर यांच्या तंत्रावर आधारित असेल

दैनिक गोमन्तक

थिएटर फ्लेमिंगो’ आपल्या ‘अ‍ॅक्टर्स लॅब’द्वारा पुन्हा निवासी नाट्यशास्त्र कार्यशाळा घेऊन येते आहे. काणकोण (Canacona) येथे होणारी ही कार्यशाळा सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि अभिनय प्रशिक्षक सॅनफोर्ड मेईस्नेर यांच्या तंत्रावर आधारित असेल. जगभर हे तंत्र ‘मेईस्नेर तंत्र’ या नावाने ओळखले जाते.

ही कार्यशाळा फक्त व्यावसायिक अभिनेत्यांनाच नव्हे तर आपल्या दैनंदिन आयुष्यापासून मोकळे होऊन काही वेगळे शिकू पाहणाऱ्यांनादेखील उपयोगी पडू शकेल. ‘नाटक’ (Drama) या माध्यमातच एक उपचारात्मक शक्यता असते आणि ‘थिएटर फ्लेमिंगो’ने यापूर्वीही अशा कार्यशाळांमधून ‘ड्रामा थेरपी’ या संकल्पनेला राबवले आहे

‘मेईस्नेर तंत्र’ असे मानते की उपलब्ध वातावरणात अभिनेत्याने स्वतःवर लक्ष केंद्रित न करता आपल्या सहअभिनेत्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या तंत्रात अशाप्रकारच्या अभ्यासाची पुनरावृत्ती केली जाते ज्यातून शब्दांपेक्षा भावनांचे महत्व अभिनेत्यात अधिक रुजले जाते. अभिनेत्याला, त्याच्या व्यक्तिरेखेच्या अंतर्गत भावनांपेक्षा, सहअभिनेत्यांवर अधिक लक्ष करण्यासंबंधीचे प्रशिक्षण ‘मेईस्नेर तंत्र’ देते

सात दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत टप्प्याटप्प्याने, विचारांपेक्षा आपल्या अंतःप्रेरणावर भर देणे, आपल्या सहअभिनेत्याला लक्षपूर्वक कसे ऐकणे इत्यादी शक्यतांचा पडताळा घेतला जाईल. पुण्याच्या (Pune) फिल्म इन्स्टिट्यूटमचे माजी विद्यार्थी आणि अध्यापक मेघ पंत हे या कार्यशाळेचे प्रशिक्षक असतील. ही कार्यशाळा 24 ते 30 नोव्हेंबर या दिवसात होणार आहे. कार्यशाळा 18 वर्षांवरील सर्वांसाठी खुली आहे. इच्छुकांनी tfgoan@gmail या पत्त्यावर संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT