Don't do these 4 things in these ten days of Ganesh Chaturthi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthiच्या या दहा दिवसांत या 4 गोष्टी करू नका

जेव्हा आपण गणपती बाप्पांला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कळत-नकळत अनेक चुका आपल्या कडून होतात.

दैनिक गोमन्तक

प्रत्येकांच्या घरात गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले आहे. बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले आहे. बाप्पांला प्रसन्न करण्यासाठी या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. बाप्पांच्या स्वागतासाठी रांगोळीची, दिव्यांची सजावट केली जाते. पण जेव्हा आपण गणपती बाप्पांला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कळत-नकळत अनेक चुका आपल्या कडून होतात. चला तर मग जाणून या दहा दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी करणे टाळावे.

* या गोष्टी अति करू नये

हे लक्षात घ्यावे की मूर्ती नाजुक आहे आणि अतिरक्त काळजी घेऊन हातळावी लागते. बाप्पाला हार आणि दागिने नेहमीच चांगले दिसतात. परंतु ते जास्त प्रमाणात घातल्यास मूर्तीला नुकसान पोहोचू शकते. म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीची काळजी घ्यावी.

* मांसाहार करू नये

अनेकांना या नियमाबद्दल माहिती असेलच की या दहा दिवसांत मांसाहार करू नये. आपण नियमांचे पालन केल्यास गणपती बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होणार.

* आपल्या सोयीनुसार गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करू नये

गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिशेने करू नये. दिलेल्या मुहूर्तानुसार बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली पाहिजे. यामुळे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील.

* कांदा आणि लसूण खाऊ नये

कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टीचा वापर आपण स्वयंपाकघरात नियमित करतो. अनेक पदार्थांमध्ये यांचा समावेश करतो. पण गणपती बाप्पासाठी भोग बनवतांना कांदा लसूनचा वापर करू नये. या नियमांचे पालन केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT