Do this remedy if you are suffering from oily and sticky hair in rainy season Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Hair Care Tips: तेलकट आणि चिपचिप केसांमुळे त्रस्त आहात ?

केसांमध्ये जास्त शॅम्पू (Shampoo) लावल्यामुळे केस कोरडे (Dry) पडतात

दैनिक गोमन्तक

पावसाळ्याच्या (Rainy Day) दिवसांत वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. यामुळे फक्त त्वचाच नाही तर केसांमध्ये देखील तेलकटपणाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत केस (Hair) खूप तेलकट (oily) आणि चिकट (sticky hair) होतात. काही मुलींचे केस लांब (Long hair) असल्याने अशा वातावरणात नेहमी केस धुणे शक्य नसते. यामुळे फक्त चिडचिडपना वाढून आपला लुक (Look) देखील खराब होतो. जाणून घेऊया अशाच काही टिप्स (Tips) जे आपल्या केसांना तेलकट (oily) आणि चिकट (sticky hair) होण्यापासून रोखण्यास मदत करतात.

* केसांमध्ये जास्त शॅम्पू लावल्यामुळे केस कोरडे पडतात. यामुळे केस देखील जास्त गळायला लागतात. अशा वेळी ड्राय शॅम्पू आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आठवड्यातून फक्त दोनदा आपले केस धुवावे. परंतु जर तुम्हाला मध्येच वाटले की केस तेलकट झाले आहे तर तुम्ही ड्राय शॅम्पू करू शकता.

* जर तुमचे केस नेहमीच तेलकट राहत असतील तर , केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावावे. तसेच केस नेहमी सौम्य शॅम्पूने धुवावे. केस धुताना जास्त गरम पाणी वापरू नये.

* तेलकट केसांमुळे फक्त आपले लूकच जात नाही तर केसांमध्ये कोंडा वाढण्याची समस्या देखील वाढू शकते. यासाठी दोन चमचे नारळाच्या तेलामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण केसांमध्ये आठवड्यातून दोन वेळा केस धुण्याआधी लावावे. यामुळे केसांमधील तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते.

* तुमचे केस कोणत्या प्रकारचे आहे. यावरून केसांसाठी उत्पादने वापरावे. तसेच तुमच्या केसांचे उत्पादन सिलिकॉन मुक्त असल्याची खात्री करावी.

* हीटिंग टूल्सचा वापर केल्याने सुद्धा केस तेलकट होतात. ही कहर आहे की हीटिंग टूल्सचा केसांना स्टाइलिश बनवतात. परंतु त्यामुळे तेलकट होऊन चिकट होतात. यामुळे जेव्हा तुम्हाला कोणत्या कार्यक्रमात जायचे असेल तेव्हाचा या टूल्सचा वापर कारावा.

* तेलकट केसांवर उत्तम उपाय म्हणजे कोरफड होय. यासाठी कोरफड जेल पाण्यात मिक्स करावे. नंतर केसांच्या मुळात लावावे. एका तासनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमच्या केसांमधील तेलकटपना कमी होण्यास मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT