Burn skinवर करा 'हे 'घरगुती उपाय  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Burn Skinवर करा 'हे 'घरगुती उपाय

टी-बॅग जळालेल्या भागावर ठेवल्यास जळजळ कमी होऊन पुरळ येण्याची भीती राहणार नाही.

दैनिक गोमन्तक

अनेक वेळा महिलांचे स्वयंपाक करतांना हात जळतात (Burn) किंवा चटका लागतो. तर कधी गरम पाण्याने (Hot water) किंवा गरम पदार्थ त्वचेवर (Skin) पडल्यास त्वचेवर फोड (Furuncle) येतात. यामुळे त्वचा खूप जळजळ (Inflammation) होते. अनेकांना त्वचेवर डागसुद्धा पडतात. पण हे डाग लगेच जात नाही. त्वचेवरील हे डाग नाहीसे होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

* जळालेल्या त्वचेवर उपाय

जळालेल्या त्वचेवर लगेच कोरफड जेल लावल्यास जळजळ कमी होते. तज्ञांच्या मते, कोरफड जेलचा वापर प्राथमिक उपचार म्हणून केला जातो. जळालेल्या भागाला पाण्याने धुतल्यानंतर त्यावर कोरफड जेल लावावे. तसेच या भागावर बटाटा लावणेसुद्धा लाभदायी ठरते. यासाठी आलुचे दोन काप करा आणि त्या जळलेल्या भागावर लावावे. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत मिळते.

* हळदीचा उपयोग

जळलेल्या त्वचेला हळदीच्या पाण्याने धुतल्यास वेदना कमी होतात. तसेच टी-बॅग जळालेल्या भागावर ठेवल्यास जळजळ कमी होऊन पुरळ येण्याची भीती राहणार नाही. शियाव मध, तुळशीच्या पानांचा रस आणि तिळाचे तेल लावल्यास फायदा होतो.

* भाजलेले डाग नाहीसे होण्यासाठी उपाय

आरोग्य तज्ञांच्या मते, भाजलेल्या भागावर आंबट पदार्थांचा वापर करावा. हे डाग कमी करण्यासाठी व्हिटॅमिन-सी गुणकारी ठरू शकते. जर भाजलेल्या भागावर टोमॅटो किंवा लिंबाचा रस लावल्यास भाजलेल्या भागावरील डाग कमी होण्यास मदत मिळते. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास जळजळ कमी होते. पण हे उपाय लगेच ताज्या जखमेवर करणे टाळावे.

* इतर उपाय

भाजलेल्या भागावरील डाग कमी करण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय हळद आणि मधाचा वापर करणे सुद्धा लाभदायी ठरू शकते. तसेच बटाट्याचे सालसुद्धा या डागावर फयदेशीर ठरतात. त्वचारोग तज्ञांच्या मते, मेथी दाण्याचा वापर डाग कमी करण्यास प्रभावी ठरते. यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट भाजलेल्या भागावर लावावी. ही पेस्ट कोरडी पडल्यानंतर धुवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT