Remedies On Neck Pain मानदुखी ही पूर्वी वयानुसार पन्नाशीला सुरू व्हायची. नव्या आयटी जमान्यात आता ती पस्तिशीच्या आतच सुरू होऊ लागली आहे.
बदललेले कामकाजाचे स्वरूप, मनोरंजनाची साधने यामुळे हे सुरू झाले आहे. सतत लांबचा प्रवास, खुर्चीवरचे काम, कॉम्प्युटर, मोबाईल यामुळेही मानदुखी तरुणपणेच गाठते.
व्यायाम, खेळ, सूर्यनमस्कार, योगा याचा सध्या विसरत पडत चालला आहे. सततचे चॅटिंग, व्हिडिओ गेम्स, फेसबुक याचा स्वातंत्र्य वापर वाढत गेल्याने मान अवघडते. पुरेशी विश्रांती मानेला मिळत नाही.
यासाठी प्रामुख्याने जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी अर्थातच खूप काळ जाईल तोपर्यंत काही उपचार खाली दिले आहेत. परिस्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते जरूर करावेत.
(1) कमीत कमी दहा मिनिटे रोज शवासन करून मानदुखी दूर करण्याच्या स्वयं सूचना देण्याचे तंत्र शिकावे.
(2) झोपताना फार जाड उशी घेऊ नये.
(3) फिजिओथेरपीस्टच्या मार्गदर्शनाने मानेचे व्यायाम करावेत जड व थकवा आणणारे व्यायाम करू नयेत.
(4) तसेच कोणाकडूनही मानमोडी किंवा बद्ध हाताने पाठीमागून खांदा उचल करू नये.
(5) बैठे काम करणाऱ्यांनी दर अर्ध्या- एक तासाने खांदे पुढे- मागे, वर- खाली व गोलाकार फिरवावेत, मानही वाकवावी, वळवावी. खुर्चीवर मागे टेकून पाच मिनिटे विश्रांती घ्यावी.
(6) भुजंगासन नियमितपणे करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.