Personality Development Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Personality Development: कामाच्या ठिकाणी 'असं' वागू नकात अन्यथा होउ शकते इमेज डाउन

आपण जेथे काम करतो तेथे काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत.

दैनिक गोमन्तक

Personality Development: तुम्ही जॉब करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय, कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी केवळ कामावरच नव्हे तर व्यक्तिमत्त्वावरही लक्ष केंद्रित करावे लागते.

करिअर आणि जीवनात व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण काम करतो तिकडे काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत.

ज्यामुळे आपले नुकसान होते आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. यासोबतच आपल्या सहकाऱ्याच्या मनात वाईट इमेज निर्माण होऊ शकते. आज अशाच काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.

  • इतरांना त्रास देणे

कामाच्या ठिकाणी कामाबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी बोलणे सामान्य आहे. पण जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला सतत त्रास देत असाल तर ही सवय तुमची इमेज खराब करू शकते. अशा प्रकारची सवय संपूर्ण ऑफिसमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्व डाउन करु शकते.

  • फोकस न करणे

कामाच्या ठिकाणी असे काही लोक असतात, जे त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांना त्याची सवय होऊ लागते आणि त्याचे नुकसान उत्पादकतेवर होऊ लागते. कुठेतरी तुम्हीही या परिस्थितीचा सामना करत असाल तर यावर काम करा. कामात लक्ष केंद्रित करण्यासाठी, लक्ष्य निश्चित करण्यासारख्या काही पद्धतींचा अवलंब करा.

  • गप्पा मारणे

बोलणे किंवा आपली बाजू मांडणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या या पद्धतीमुळे इतरांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची सवय तुमची इमेज डाउन करू शकते. अशा परिस्थितीत लोक बोलणे टाळू लागतात आणि यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे नुकसान होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT