Dry Flowers Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Flowers: पुजेला वापरलेल्या फुलांपासून 'अशी' बनवा ऑर्गेनिक अगरबत्ती

पुजासाठी वापरलेल्या फुलांपासून तुम्ही घरीच अगरबत्ती बनवु शकता.

Puja Bonkile

Dry Flowers: देवघरात किंवा घरात अगरबत्ती लावल्यास वातावरण प्रसन्न होते. असे मानले जाते त्याचा सुगंध सकारात्मकता आणतो आणि ज्या वस्तूपासून ते तयार केले जाते. त्यामध्ये असे गुणधर्म असतात जे वातावरण शुद्ध करतात. अनेक प्रकारच्या सुगंधित अगरबत्ती मार्केटमध्ये उपलब्ध असतात. पण तुम्ही घरी देखील अशा सुगंधित अगरबत्ती तयार करू शकता.

तुम्ही जर घरी अगरबत्ती बनवत असाल तर यासाठी वाळलेल्या फुलांची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही पूजेसाठी वापरलेल्या फुलांचा वापर करू शकता. लोक सहसा असे फुल मातीत मिक्स करून देतात पण आता असे न करता तुम्ही अगरबत्ती तयार करू शकता.

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य

5-7 झेंडूची फुले

6-8 गुलाब

1-2 तेजपान

3 कापूर

कोळसा आणि शेणाचे भांडे

धूप जाळणारा

हवण सामग्री

३ चमचे तूप

2 टीस्पून तीळाचे तेल

1 चमचा मध

पहिले करा 'हे' काम

अगरबत्ती बवण्यासाठी सर्वात पहिले वाळलेली फुले, कोळशाचा एक छोटा तुकडा, वाळलेले शेण , तेजपान, चंदन आणि हवन पावडर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करावे. हे मिश्रण चाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे.

ही गोष्ट करा मिक्स

पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये तूप, तिळाचे तेल, मध आणि पाणी मिक्स करावे. लक्षात ठेवा की पाण्याचे प्रमाण 2-3 चमचे पेक्षा जास्त नसावे.

अशी बनवा अगरबत्ती

सर्व साहित्य चांगले मिक्स करावे आणि त्याचे छोटे गोळे बनवावे. नंतर आवडीनुसार आकार द्यावे. आता सर्व अगरबत्ती उन्हात नीट वाळवायला ठेवावे. तुमची ऑर्गेनिक अगरबत्ती वापरण्यासाठी तयार आहेत.

या गोष्टी ठेवा लक्षात

पावडर खूप कोरडी वाटत असेल तर त्यात तिळाचे तेल किंवा तुपाचे प्रमाण वाढवावे.

जर तुम्हाला जास्त सुगंध आवडत असेल तर तुम्ही त्यात सुगंधित तेल घालू शकता किंवा कापूरचे प्रमाण वाढवू शकता.

तसेच झेंडू किंवा गुलाबाऐवजी तुम्ही कोणतेही सुवासिक फूल वापरू शकता.

याशिवाय, अगरबत्ती पूर्णपणे कोरडी असावी हे लक्षात ठेवावे.

अन्यथा ती पेटवण्यास अडचण येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT