Diwali Bhaubeej 2022 Date and Time Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Bhaubeej 2022 Date and Time : यंदा 2 दिवस असणार भाऊबीज; जाणून घ्या दोन्ही दिवसांचे शुभ मुहूर्त आणि महत्व

Diwali Bhaubeej 2022 Date and Time :शास्त्रानुसार भाईबीजेच्या दिवशी यमराज, यमदूज आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. त्यांच्या नावाने अर्घ्य आणि दिवा दान करावा.

दैनिक गोमन्तक

Diwali Bhaubeej 2022 Date and Time : दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या दिवाळीत सूर्यग्रहण असल्याने तारखांबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. अशा स्थितीत भाऊबीजेचा सण कोणत्या दिवशी साजरा होणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. जाणून घ्या 26 किंवा 27 ऑक्टोबरला कोणत्या दिवशी साजरी होणार भाऊबीज.

(Diwali Bhaubeej 2022 Date and Time )

भाऊबीजेची पूजा

धर्मग्रंथानुसार यमद्वितीयाच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी यमराज दुपारी बहिणीच्या घरी आले आणि बहिणीची पूजा स्वीकारल्यानंतर ते तिच्या घरी जेवले. वरदानात यमराजांनी यमुना यांना सांगितले की, जे भाऊ यादिवशी म्हणजेच यम द्वितीयेच्या दिवशी आपल्या बहिणींच्या घरी येतात आणि त्यांची पूजा स्वीकारतात आणि त्यांच्या घरी भोजन करतात त्यांना त्यांच्या अकाली मृत्यूचे भय राहत नाही.

कोणाची पूजा करावी-

शास्त्रानुसार भाईबीजेच्या दिवशी यमराज, यमदूज आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. त्यांच्या नावाने अर्घ्य आणि दिवा दान करावा.

26 ऑक्टोबरसाठी हा आहे शुभ मुहूर्त :

यावर्षी कार्तिक कृष्ण पक्षाची दुसरी तिथी 26 आणि 27 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी येत आहे. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02.43 वाजून 43 मिनिटांनी भाऊबीजेचा मुहूर्त सुरू होईल, जो 27 ऑक्टोबर रोजी रात्री 12.45 वाजेपर्यंत असणार. यादिवशी भावाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 12:14 ते 12:47 पर्यंत असेल.

27 ऑक्टोबरसाठी हा आहे शुभ मुहूर्त :

अनेक ठिकाणी तिथीनुसार 27 ऑक्टोबर रोजी भाईबीजेचा सण साजरा केला जाणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी भाईबीजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11.07 ते दुपारी 12.46 पर्यंत असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT