Diwali 2023 Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीपुर्वी घरातील 'या' वस्तु करा दुरूस्त

वास्तुनुसार दिवाळीपुर्वी घरातील पुढील वस्तु दुरूस्त केल्यास अनेक दोष दूर होतील.

Puja Bonkile

Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीत तुमचे घर सुंदर बनवण्यासाठी तुम्ही वास्तु टिप्स फॉलो करू शकता. वास्तूनुसार घरामध्ये पलंग कोणत्या दिशेला असावा, घरात जेवणाचे टेबल असेल तर ते कोणत्या दिशेला असावे, घरात मंदिर कोणत्या दिशेला असावे. यासारखे प्रश्न तुमच्या मनात असेल तर याचे उत्तर जाणून घेऊया.

कोणत्या दिशेला अंथरुण ठेवावे

जर तुम्ही घरी नवीन बेड आणत असाल किंवा तुमच्या घरातील फर्निचर बदलण्याचा विचार करत असाल तर या वास्तु टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. बेडरूममध्ये पलंग नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावा. विशेष काळजी घ्या की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे डोके नेहमी दक्षिण दिशेला असावे. पाय दक्षिणेकडे तोंड करून कधीही झोपू नका. वास्तुनुसार हे शुभ मानले जात नाही. जर तुम्ही दिशा बदलण्याचा विचार करत असाल तर ही दिशा पाळावी.

जेवणाचे टेबल कोणत्या दिशेला ठेवावे? 

घरात डायनिंग टेबल असणे खूप शुभ मानले जाते. अन्न नेहमी जेवणाच्या खोलीतच खावे; अंथरुणावर अन्न खाल्ल्याने दोष येतो, म्हणून ते निषिद्ध आहे. जेवणाची खोली दक्षिण, पश्चिम किंवा पूर्व दिशेला स्वयंपाकघराशी जोडलेली असावी. याशिवाय, जर तुम्ही घरात जेवणाचे खोली बनवत असाल तर त्यासाठी आदर्श दिशा पश्चिम आहे कारण ते अन्न खाण्यासाठी सर्वात शुभ स्थान मानले जाते. 

गृह मंदिर कोणत्या दिशेला असावे?

जर तुम्ही घरात मंदिराची स्थापना करत असाल तर घराचे मंदिर उत्तर-पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे याची विशेष काळजी घ्यावी. ईशान्य दिशेला देवांचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे ही दिशा मंदिरासाठी शुभ मानली जाते. दिवाळीपूर्वी घरातील मंदिराची वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती ईशान्य दिशेला ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT