Diwali 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali 2023: माता लक्ष्मीची आरती करतांना 'या' चुका टाळा, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

माता लक्ष्मीची आरती करतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Diwali 2023: हिंदु धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे. यंदा 12 नोव्हेंबर 2023 रोजी हा सण साजरा केला जाणार. असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय, पूजा, मंत्र, पठण केले जातात. परंतु यावेळी माता लक्ष्मीची आरती करताना काही नियम पाळले पाहिजे. अन्यथा माता लक्ष्मीनाराज होऊ शकते.

दिव्याची योग्य दिशा

लक्ष्मीपुजनाच्या वेळी माता लक्ष्मीसमोर डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा राहते.

ओरडून आरती म्हणू नका

लक्ष्मीपुजनाच्या वेळी आरती करतांना मोठ्याने टाळ्या वाजवू नका आणि मोठ्या आवाजात आरती म्हणू नका. असे मानले जाते की माता लक्ष्मीला जास्त आवाज आवडत नाही. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.

शुभ आकडा

लक्ष्मी पुजनाच्या वेळी तुपाच्या दिव्यांनी करावी. आरतीतील दिव्यांची संख्या एक, पाच, नऊ, अकरा किंवा एकवीस असू शकते.

अंधार करू नये

लक्ष्मी पूजेनंतर माता लक्ष्मीचे स्थान असलेल्या ठिकाणी अंधार निर्माण करू नका. या ठिकाणी सतत दिवा लावून ठेवावा. माता लक्ष्मीला अंधारात राहणे आवडत नाही.

  • नवे कपडे

दिवाळीत माता लक्ष्मीची पुजा करतांना जुने आणि अस्वच्छ कपडे घालू नका. तसेच चुकूनही पुजेत काळ्या रंगाचे कपडे आणि वस्तु वापरू नका.

  • मांसाहार टाळावा

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे मासांहार करू नका. फक्त सात्विक आहार बनवावा. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.

  • पैसे उधार देऊ नका

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी कोणालाही मीठ, झाडू, साखर किंवा पैसे उधार देऊ नका. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT