Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetic Diet: गोड खाण्याची तल्लफ! मधुमेही रुग्ण खाऊ शकतात 'हे' गोड पदार्थ, वाचा काय सांगतात तज्ञ

Healthy Desserts For Diabetics: मधुमेही रुग्णांसाठी गोड पदार्थांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मधुमेही रुग्ण साखर किंवा त्यापासून बनवलेले गोड पदार्थ खाऊ शकत नाहीत. साखर आणि त्यापासून बनवलेल्या मिठाई खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते.

Manish Jadhav

देशात गेल्या काही वर्षात मधुमेह रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मधुमेही रुग्णांना आहाराची अनेक पथ्थे पाळावी लागतात. मधुमेही रुग्णांनी गोड पदार्थ खाऊ नयेत असे सांगितले जाते. डॉक्टर साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळेही खाण्यास रुग्णांना मनाई करतात. मात्र मधुमेही रुग्णाला गोड खाण्याची इच्छा झाल्यास त्याने काय करावे? त्यांच्यासाठी असे काय आहे जे त्यांची मिठाई खाण्याची तल्लफ भागवू शकेल? मधुमेही रुग्ण त्यांची भूक भागवण्यासाठी काही गोड पदार्थ आणि फळे खाऊ शकतात का? चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

मधुमेही रुग्णांसाठी गोड पदार्थांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मधुमेही रुग्ण साखर किंवा त्यापासून बनवलेले गोड पदार्थ खाऊ शकत नाहीत. साखर (Sugar) आणि त्यापासून बनवलेल्या मिठाई खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. यामुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. जर एखाद्या मधुमेही रुग्णाला गोड खाण्याची इच्छा असेल तर तो काही फळे आणि गोड पदार्थ खाऊ शकतो. यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढणार नाही आणि गोड पदार्थांची त्यांची तल्लफही भागेल.

दिल्लीतील वरिष्ठ वैद्य डॉ. कवलजीत सिंह सांगतात की, मधुमेही रुग्ण सफरचंद, नाशपाती, स्ट्रॉबेरी अशी गोड फळे खाऊ शकतात. याशिवाय, मर्यादित प्रमाणात मध, स्टीव्हिया आणि खजूर देखील खाऊ शकता. या फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे मधुमेही रग्णांसाठी फायदेशीर ठरतात. या फळांशिवाय, प्रथिनेयुक्त पदार्थ काजू, दही आणि ग्रीक योगार्ट देखील मधुमेही रुग्ण खाऊ शकता. हे पदार्थ मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच, एवोकॅडो चॉकलेट मूस, चिया सीड्स पुडिंग आणि शुगर-फ्री केळी हे मधुमेही रुग्णांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.

ही काळजी घ्यावी

मधुमेही रुग्णांनी मर्यादित प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करावे. यासाठी ते त्यांच्या डॉक्टरांकडून (Doctors) एक चार्ट देखील बनवून घेऊ शकतात. मधुमेही रुग्णांनी नियमित व्यायाम करावा. जर ते व्यायाम करु शकत नसतील तर त्यांनी किमान 40 मिनिटे चालले पाहिजे. या गोष्टी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT