Foods for Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Foods for Diabetes: मधुमेही व्यक्तींनी हिवाळ्यात अवश्य खावेत 'हे' पदार्थ

Foods for Diabetes: डायबेटीज असणाऱ्या लोकांनी आपली भूक भागवण्यासाठी 1ते 2 तासानंतर खात राहणे अवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

Foods for Diabetes: डायबिटीज पेशंट असलेल्या लोकांना सारखी भूक लागत असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर जास्त भूक लागते. त्यामुळे अशा व्यक्तींनी 1 ते 2 तासानंतर थोडं-थोडं खात रहावं. थंडीतील कमी तापमानामध्ये शरीराला उष्णतेची आणि इंशुलिनची खूप गरज असते. या दिवसांमध्ये मेटाबॉलिजम वाढतो. त्यामुळे भूक पण खूप वाढते. अशावेळी डायबेटीज असणाऱ्या लोकांनी आपली भूक भागवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • स्प्राउट्स

Sprouts

स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्ये. सकाळच्या नाश्तासाठी स्प्राउट्स खाणे हा उत्तम पर्याय आहे. स्प्राउट्स शरीरासाठी खूप पोषक आहे. त्यामुळे आपली भूक भागते. एक कप स्प्राउट्समध्ये 14 कार्बोहाइड्रेट आणि ६ ग्रॅम डाइट्री फाइबर असते. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

  • भाज्यांपासून बनलेले सूप

vegetable soup

शरीरासाठी खूप पौष्टिक आणि टेस्टी लागणारे, भाज्यांपासून बनलेले सूप मधुमेही लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा कोणत्याही वेळेला सूप प्यायले तरी उत्तम. शरीराला लागणारे सर्व पोषक पदार्थ सूपमधून मिळत असल्यामुळे सूप आवश्यक प्यावे. चिकन सूप, डाळींचे सूप, भाज्यांपासून बनलेले सूप असे सूपचे विविध प्रकार तुम्ही ट्राय करु शकता.

  • भोपळ्याच्या बिया

Pumpkin Seed

मधुमेही व्यक्ती साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा आहारात (Food) समावेश करतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर हेल्दी फॅट असतात. फायबरयुक्त भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुरळीत राहते.

  • काजू

cashew nut

मधुमेही (Diabetes) व्यक्तींनी हिवाळ्यात काजू आवश्यक खावेत. काजूमुळे शरीराला उष्णता मिळते. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहते. काजूमध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी असून भरपूर हेल्दी फॅट असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT