Diabetes Care: सर्व प्रकारच्या भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का काही भाज्या खाल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते. जगभरात मधुमेहाच्या रूग्णांची सख्या वाढत आहे. जर तुमच्या घरात देखील मधुमेहाचे रूग्ण असेल तर या भाज्या खाणे टाळावे.
मधुमेहाच्या रुग्णांनी ठराविक भाज्या खाऊ नयेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. विशेषत: ज्या भाज्या जमिनीखाली पिकतात. अशा भाज्या मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारातून वगळल्या पाहिजेत.
मधुमेहींनी कोणत्या भाज्यांचे सेवन टाळावे
ज्या भाज्यांमध्ये ग्लायकोसेमिक इंडेक्स जास्त आहे, अशा भाज्या साखर म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नयेत. असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा भाज्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. ज्यामुळे मधुमेही रुग्णाची तब्येत बिघडू शकते.
गाजर आणि बीट
गाजर आणि बीटसारख्या भाज्यांमध्ये नैसर्गिक साखर असते. यामुळे ज्यूस बनवून तो पिणे किंवा थेट खाणे मधुमेहींसाठी गातक ठरी शकते.
रताळे
रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहींना रताळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.
बटाटे
मधुमेह असणाऱ्या लोकांनी बटाटे खाऊ नये. कारण यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधुक असते. जे मधुेहींसाठी घातक ठरू शकते.
स्वीट कॉर्न
अनेक भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न वापरले जाते. पण मधुमेहींनी स्वीट कॉर्न खाणे टाळावे. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
या भाज्यांचे करावे सेवन
आरोग्य तज्ज्ञांचे मते, जमिनीवर उगवणाऱ्या कमी कार्बोहायड्रेट भाज्यांमध्ये कमी कार्बोहायड्रेट असतात. जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.यामध्ये पालक, कोबी, फरसबी आणि ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.तसेच टोमॅटो, बीन्स, वांगी, मशरूम, कांदा, काकडी या भाज्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.