Devshayani Ekadashi 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Devshayani Ekadashi 2022: देवशयनी एकादशीला करा हा उपाय, घरात नांदेल सुख-शांती

आज देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

सनातन धर्मातील देवशयनी एकादशी हा वर्षाचा महत्वाचा दिवस आहे. जेव्हा भगवान विष्णू चार महिने योगनिद्रामध्ये जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागे होतात. धार्मिक श्रद्धेनुसार या एकादशी तिथीला विष्णूजींची श्रद्धेने पूजा करून काही उपाय केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. (Devshayani Ekadashi 2022 News)

* मुलाच्या कल्याणासाठी
एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत करा, विष्णू सहस्रनाम किंवा गोपाल सहस्रनामाचे पठण करा, असे केल्याने तुमची मुले योग्य होतात आणि त्यांचे दुःख दूर होतात.

* पुण्यप्राप्तीसाठी
आवळा भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी आवळ्याचा रस पाण्यात टाकून आंघोळ केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच जीवनातील सर्व पापे दूर होतात.

* संपत्तीसाठी

देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री नारायणांना कच्च्या दुधात केशराचा अभिषेक केल्याने भगवान नारायण प्रसन्न होतात. त्यांचे घर नेहमी धन आणि अन्नाने भरलेले असते.

(Devshayani Ekadashi 2022)


* नकारात्मक ऊर्जा दूर होईल

शंखध्वनी आध्यात्मिक शक्तीने संपन्न आहे. त्याचा आवाज जोपर्यंत पोहोचतो तोपर्यंत सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच वातावरणात राहणारे सर्व जंतू नष्ट होतात. या दिवशी पूजा केल्यानंतर घरभर शंख पाणी शिंपडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

* रोग दूर करण्यासाठी
देवशयनी एकादशीच्या दिवशी दानाचे खूप महत्त्व आहे. जर तुमच्या घरात कोणी खूप आजारी असेल तर गरजूंना फळे, औषधे आणि कपडे दान करावे. यामुळे तुम्हाला मानसिक शांती तर मिळतेच पण असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे आजार बरे होतात.

* श्री हरी आणि माँ लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो
या दिवशी रात्री भगवान नारायणाच्या प्रसन्नतेसाठी नृत्य, भजन-कीर्तन आणि स्तुतीद्वारे जागरण करावे. नद्यांच्या काठी व दिवे दान केल्याने श्री हरी आणि माँ लक्ष्मीची कृपा कायम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT