Dengue Mosquito Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dengue Mosquito: फ्रिजमध्ये होऊ शकते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती, अशी घ्या काळजी

डेंग्यूमुळे शरीरतील प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Dengue Mosquito: डेंग्यू हा एडिस डासांच्या चाव्याने होतो. पावसाळ्यात हा आजार जास्त वाढतो. सध्या देशभरात अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रूग्ण झपाट्याने वाढले आहे. यामुळे अनेकांचा मृत्यू देखील होत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच या आजाराला बळी पडत आहे. डेंग्यूच्या डासांची घरातही अनेक कारणांमुळे उत्पत्ती होऊ शकते. यापैकी एक फ्रिजचा ट्रे देखील आहे. अशावेळी घरातील फ्रिजची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. जाणून घ्या डेंग्यू या आजारापासून स्वत:चे रक्षण कसे कराल.

  • डेंग्यूची लक्षणे कोणती

डेंग्यू हा एडिस डासांच्या चाव्याने होतो. पावसाळ्यात हा आजार जास्त वाढतो. या आजारामध्ये पुढिल लक्षणे दिसतात.

ताप

शरीरात वेदना होतात

अंगावर पुरळ येतात

उलट्या

जुलाब

प्लेटलेट्स कमी होणे

  • फ्रिजचा ट्रे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. या डासांची उत्पत्ती थोड्याशा पाण्यात देखील होऊ शकते.अनेक वेळा फ्रिजच्या ट्रेमध्ये अळ्या आढळतात. याकडे दुर्लक्ष केल्यास या आजाराला आपण बळी पडू शकतो. यामुळे फ्रिजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी स्वच्छ करावे. घरात कुठेही पाणी साचु देऊ नका. घराच्या आजुबाजुचा परिसर देखील स्वच्छ ठेवावा.

या अळ्या किती दिवस राहतात जिंवत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते डेंग्यूची अंडी किंवा अळ्या सहा महिने जिंवत राहू शकतात. या काळात अंडी स्वच्छ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यांचे डासांमध्ये रूपांतर होते. यामुळे घराच्या आजूबाजूला जास्तीत जास्त स्वच्छता ठेवावी. कारण डेंग्यू हा आजार जीवघेणा देखील ठरू शकतो.

 असा करा बचाव

रोज झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

घरातील पाण्याची टाकी झाकून ठेवावी.

बाहर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे.

घराच्या बाहेरील नाले स्वच्छ ठेवावे.

ताप आल्यास लगेच डेंग्यूची तपासणी करावी.

तसेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT