Hartalika 2023: हरतालिकेच्या दिवशी करा 'हे' उपाय, दूर होतील अनेक समस्या

हरतालिकेला विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली चांगला पती मिळावा यासाठी व्रत करतात.
Hartalika 2023
Hartalika 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

हरतालिकेची पुजा विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. या पुजेमुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते. तर अविवाहित मुला चांगला पती मिळावा यासाठी मनोभावे पुजा करतात. असे मानले जाते की पार्वतीने हे व्रत भगवान शंकरासाठी हे व्रत ठेवले होते. हे व्रत पाळल्याने पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते.

वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हरतालिकेचा दिवस उत्तम आहे. या दिवशी केलेले काही उपाय वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येतात.तुमच्या जीवनात समस्या असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता.

  • भगवान शंकारच्या मंदिरात जावे

वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी हरतालिकेचा दिवस खूप शुभ मानला जातो. पती-पत्नीमध्ये दूरावा असल्यास हरितालिकाच्या दिवशी पती-पत्नीने भगवान भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन शंकराच्या मूर्तीसमोर तुपाचा चारमुखी दिवा लावावा.

  • सिंदूर अर्पण करावे

महिलांनी या दिवशी पार्वतीला सिंदूर आणि लाल बांगड्या अर्पण करणे शुभ मानले जाते. यासोबतच ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम राहते.

  • कुंकु

वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी हरतालिकेच्या दिवशी कुंकु लाल कपड्यात बांधून आपल्या बेडरूमच्या कपाटात लपवून ठेवावी. यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतो.

Hartalika 2023
Ganesh Chaturthi Special Look: गणेश चतुर्थीला खास दिसण्यासाठी असा करा झटपट मेकअप

हळदीचा उपाय

हरतालिकेच्या दिवशी सकाळीच आंघोळ करून पत्नीने पतीच्या हाताला एका छोट्या कापडमध्ये हळद ठेवून ते बांधावी आणि संध्याकाळी ती गाठ उघडून मंदिरात कपड्यात गुंडाळून ठेवावी. असे मानले जाते की या दिवशी हे विशेष उपाय केल्याने पती-पत्नीचे नाते मजबूत होते.

  • कापुर

हरतालिकेच्या दिवशी पूजा केल्यानंतर कापूर जाळून घरातील सर्व खोल्यांमध्ये, विशेषतः बेडरूममध्ये फिरवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनावर कोणतेही संकट येत नाही.

अविवाहित मुलींसाठी उपाय

हरतालिकेच्या संध्याकाळी भगवान शिव आणि पार्वतीच्या मंदिरात जाऊन तुपाचे 11 दिवे लावावे. चांगला पती मिळवण्यासाठी अविवाहित मुली हरतालिकेच्या दिवशी हा खास उपाय करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com