Dengue Fever| healthy tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dengue Fever: तुम्हाला डेंग्यू झाला असेल तर 'हे' 5 स्पेशल Drinks नक्की करा ट्राय

Dengue Care Tips: शरिरातील प्लेटलेट्स कमी झाल्यास त्या वाढवण्यासाठी खास पेय घरीच बनवा.

दैनिक गोमन्तक

Dengue Fever: हिवाळ्याची सुरुवात होताच देशात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत डेंग्यूच्या 1200 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूच्या डासांना एडिस किंवा टायगर मॉस्किटो म्हणून ओळखले जाते. त्याच्या शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असल्याने त्याला टायगर डास म्हणतात. डेंग्यूचा डास दिवसा चावतो. ज्या व्यक्तीला हा डास चावतो त्याच्या प्लेटलेट्समध्ये कमी होतात. ज्यामुळे ताप, सांधेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात.

  • डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी घरीच बनवा हे खास ड्रिक्स

  • कडुलिंबाचे पाणी

काही ताजी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळावे आणि चहा बनवुन सेवन करावे. असे केल्याने शरीरातील वेदना दूर होतात आणि त्याच वेळी ते हायड्रेटेड राहते.

  • पपईची पाने

डेंग्यू (Dengue) झाल्यास दोन ताजी पपईची पाने पाण्यात उकळा. ते चांगले उकळल्यानंतर ते मॅश करा आणि नंतर पाणी पिळून सेवन करावे. हे पाणी प्यायल्याने तुमच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवते.

  • काळमेच पाने

कडुनिंबाच्या पानांप्रमाणेच काळमेचच्या पानांमध्ये विषाणूविरोधी गुणधर्म असतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी हे औषधी वनस्पती फायदेशीर आहे.

  • कारल्याचा रस

डेंग्यूमध्ये कारल्याचा रस देखिल रामबाण उपाय ठरतो. कारल्याचा रस बनवण्यासाठी आधी त्याची साल काढून त्याचे तुकडे करा. नंतर कारले पाण्यात उकळा. नंतर रस गाळून सेवन करा.

  • तुळशीचे पान

डेंग्यू झाल्यास तुळशीचा चहाही पिऊ शकता. जर तुम्ही ग्रीन टी प्याल तर त्यामध्ये तुळशीची पाने मिक्स करुन पिऊ शकता. पण चुकूनही दूध (Milk) मिक्स करु नका. तुळशीची ताजी पानं पाण्यात उकळून नंतर चांगली गाळून घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस घाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT