Delicious village pohe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

स्वादिष्ट, रुचकर गावठी पोहे

बाजारात विक्रीस येणाऱ्या पोह्यामध्ये गावठी पोहे सर्वात अधिक रुचकर आणि स्वादिष्ट असतात.

दैनिक गोमन्तक

दिवाळीचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पोहे. पोह्यापासून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ व पोहे दिवाळी दिवशी फराळाच्या ताटात दिसतात. त्यासाठी गावठी पोह्याना पर्याय नसतो. बाजारात विक्रीस येणाऱ्या पोह्यामध्ये गावठी पोहे सर्वात अधिक रुचकर आणि स्वादिष्ट असतात. गेल्या काही वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांनी आपला शेतीचा पारंपरिक व्यवसाय कमी केलेला असला तरी लोटली, कामुर्ली, राशोल, राय, गणपोगा, आंबोडा आदी भागात तसेच शिरोडा भागातील खाजन शेतीत भाताचे पीक अजुनही घेतले जाते. ह्या भातापासून गावठी पोहे बनवून घेण्याची परंपराच गोव्यात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बाजारातदेखील दुकानदारांकडे पोहे खरेदी करताना, गावठी पोहेच द्या अशी आग्रही मागणी असते. खाजोर्डा, बोरी येथे कृष्णा उर्फ दिलीप नाईक विज्ञान शाखेचे पदवीधर, वास्कोच्या झुवारी अॅग्रोकेमिकल खत कारखान्यातून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यानी आता आपल्या वडिलोपार्जित असलेल्या पोहे मशीन चालवण्याचा उद्योगात रस घातला आहे.. त्याच्या या आस्थापनात मसाला कांडणे, पीठ करणे, भातापासून तांदूळ हासडणे, नारळाच्या खोबऱ्यांचे तेल बनवून देणे इत्यादी कामे होतात. दसरा झाल्यावर ते लोटली कुडतरी, राय, कामुर्ली आदी भागातील शेतकऱ्यांकडून भात खरेदी करतात व स्वतःच्या पोहे बनविण्याच्या गिरणीवर पोहे बनवतात. किन्नुर, हुबळी वगैरे भागातून गिरणीत काम करणारे कामगार आणले जातात. भात भाजण्यासाठी लागणारा भूसा फोंड्यातील वखारी मधून आणला जातो.

भात भाजण्याची रेती बापी गुजरात येथून येते. परंतु अलीकडे बेळगाव भागातली वापीची रेतीही पोहे बनवण्यासाठी वापरली जाते.. त्यांच्याकडे बनणाऱ्या पोह्यंसाठी गोव्यातील सर्व भागांतून मागणी असते. लोक भाताच्या पिशव्या घेऊन पोहे बनवून घेण्यासाठी येतात.. फोंडा, शिरोडा मडगाव आदी जवळपासच्या बाजारपेठेत मिळणारे गावठी पोहे हे बहुदा दिलीप नाईक यांच्याच गिरणीवर बनवलेले असतात. त्यांच्याकडे उत्कृष्ट दर्जाचे पोहे मिळतात त्यामुळे पोहे विकत घेणाऱ्यांची गर्दी त्यांच्याकडे सदोदित दिसते. दिलीप नाईक याना त्याच्या या वडिलोपार्जीत उद्योगाविषयी ममत्व आहे त्यामुळे हा व्यवसाय आपण सदोदित चालवत राहू असे ते म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT