Mental Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mental Health: नैराश्याचा सामाना करत आहात ? 'या' 7 उपाय ठरू शकतात फायदेशीर

Mental Health: मानसिक तणाव निर्माण होणे साहजिक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mental Health: आज बदलत्या जीवनशैलीचा आपल्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसतो. तणाव, नैराश्य या आजच्या सर्वात मोठ्या समस्या होताना दिसत आहेत. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा नैराश्य येऊ नये यासाठी आपण काही गोष्टी करु शकतो.

1. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. आपल्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ नदी, झाडे , समुद्रकिनारे यांच्या सानिध्यात घालवू शकता. यामुळे तुमच्या मनावरचा ताण हलका होण्यास मदत होईल.

2. योगाअभ्यास करा. श्वासोच्छवासावर नियंत्रण मिळवा.

3. तुमच्याकडे सध्या जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

4. सतत तक्रार करणे बंद करा.

5. तुमच्या नात्यांना जपा. तुमच्या माणसांसोबत वेळ घालवा. त्यांच्याशी गप्पा मारा. संवाद साधता येणे मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असते.

6. अॅक्टीव्ह रहा. वेगवेगळ्या कृती करत राहा. शारीरीक व्यायाम करा.

7. मजा करा. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो त्या गोष्टी करा.

अशा अनेक पद्धतीने तुम्ही नैराश्यात जाण्यापासून वाचू शकता. मानसिक तणाव कमी करु शकता. आजची जीवनशैली ज्या वेगाने चालत आहे त्यामुळे मानसिक ताण निर्माण होणे साहजिक आहे.

मात्र तो तणाव वाढणार नाही याची सर्वोतपरि काळजी आपण घेऊ शकतो. तुम्हाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या आजुबाजूला नेहमी असतात, त्याचा शोध घ्या. नैराश्यापासून दूर जाण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT