National Safe Motherhood Day 2023: गरोदरपणात 'या' गोष्टींची घ्यावी काळजी

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस दरवर्षी ११ एप्रिल रोजी अनेक देशात साजरा केला जातो.
National Safe Motherhood Day 2023
National Safe Motherhood Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Safe Motherhood Day: राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी अनेक देशात साजरा केला जातो. गरदोरपणात खास काळजी घेणे गरजेचे आहे. पण काळजी न घेतल्यास महिलेच्या आणि बाळाच्या आरोग्याला धोका पोहोचु शकतो.

गर्भधारणे दरम्यान, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर गर्भवती महिलांसाठी आरोग्य सेवेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जोतो. व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) ने ही मोहीम सुरू केली होती. प्रसूतीपूर्व काळजी आणि योग्य काळजी न मिळाल्याने देशात दरवर्षी हजारो गर्भवती महिलांचा मृत्यू होतो.

भारत सरकारने व्हाईट रिबन अलायन्स इंडियाच्या प्रस्तावावर कारवाई केली आणि 11 एप्रिल हा दिवस 'राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस' म्हणून ओळखला जातो.

प्रसूतीमध्ये होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी आजकाल महिलांनी सिझेरियन प्रसूतीचा पर्याय निवडायला सुरुवात केली आहे. नॉर्मल डिलिव्हरी तुमच्या शरीरासाठी आणि बाळासाठी चांगली आहे. सामान्य प्रसूतीनंतर बरे होण्याचा कालावधी कमी असतो तर सिझेरियन सेक्शननंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.

  • शरीरीची मालिश करावी

ज्या महिला (Women) पहिल्यांदाच आई बनत आहेत, त्यांनी विशेषत: योनी आणि गुदद्वारातील भाग म्हणजेच पेरिनियम म्हणजेच पेरिनियम या भागाची मालिश करावी. या भागात मसाज केल्याने, या भागाचे स्नायू शिथिल होतात आणि प्रसूतीसाठी तयार होतात. नवव्या महिन्यात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मसाज केल्याने तुमचे खालचे शरीर सामान्य प्रसूतीसाठी तयार होते.

  • सतत कामात राहा

महिलांना अनेकदा गरोदरपणात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला सक्रिय राहावे लागते तसेच गरोदरपणात विश्रांती घ्यावी लागते. तुमची नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझरद्वारे बाळाचा जन्म असो, दोन्ही परिस्थितींमध्ये गर्भधारणेदरम्यान सक्रिय राहणे आवश्यक आहे.

National Safe Motherhood Day 2023
National Pet Day 2023: पाळीव प्राणी अन् पक्षी घरात ठेवण्याचे जाणून घ्या वास्तू नियम
  • आरोग्य तज्ञांशी संपर्क साधावा

जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर तुम्ही या कामात तज्ज्ञ डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सामान्य प्रसूतीमधील तज्ञ डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेच्या वेळीच मार्गदर्शन करून सामान्य प्रसूतीची शक्यता वाढविण्यात मदत करू शकतात.

प्रसूती दरम्यान त्यांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. तज्ञांच्या सल्ल्याने, तुम्ही नैसर्गिक जन्मासाठी मदत करण्यासाठी पर्याय आणि पद्धती जाणून घेऊ शकता.

  • वेदना सहन करण्याचा प्रयत्न करा

असे अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने गर्भवती स्त्री पोटात उद्भवणारे कॉन्‍ट्रॅक्‍शन सहन करू शकते. तुम्हाला वेदना होत असताना आराम करण्याचे तंत्र शिकावे लागेल.

या कामात अनेक व्यायाम (Yoga) तुम्हाला मदत करू शकतात. तुमच्या जोडीदाराला खांदे आणि मानेचे स्नायूंची मसाज करण्यासाठी सांगावे. हे तुम्हाला तुमचे स्नायू आराम करण्यास आणि प्रसूतीसाठी तुमच्या डोक्याला तयार करण्यास मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com