Daily Yoga  
लाइफस्टाइल

Daily योग: जाणून घ्या अर्ध हलासनाचे फायदे

गोमन्तक वृत्तसेवा

'अर्ध हलासन' करताना आपले शरीर हे अर्ध्या नांगराप्रमाणे दिसते. उच्चरक्तदाब, बद्धकोष्ठता यांसारखे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकारे हे आसन नियमित केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. 

अर्ध हलासन कसे करावे?

  • पाय जमिनीला टेकवून हात आणि पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत पाठीवर झोपा. 
  • दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यांत न वाकवता हळूहळू वर नेत 30 अंशाच्या कोनात आणा. 
  • काही क्षणांनंतर दोन्ही पाय 60 अंशाच्या कोनात आणा. 
  • पाय हळूहळू आणखी वर नेत काटकोनात आणा. 
  • ही आसनाची अंतिम स्थिती असेल. अर्ध हलासन करताना कमरेपासून खांद्यांपर्यंतचा भाग सरळ असणे आवश्यक आहे. 
  • अंतिम स्थितीत सहज शक्य असेल तेवढा वेळ राहा. त्यानंतर हळूहळू पाय पुन्हा जमिनीवर सरळ रेषेत आणा. 

अर्ध हलासनाचे फायदे- 

  • व्हेरिकोज वेन्सचा (varicose veins) आजार असलेल्यांनी हे आसन केल्यास फायदेशीर ठरेल. 
  • या आसनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 
  • पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. 
  • ओटीपोटातील स्नायू, मांड्या आणि पायांचे स्नायू बळकट करते. 
  • रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT