Daily Horoscope 21 July Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 21 July: कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 21 July: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष :

कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे.  (Daily Horoscope 21 July)

  • वृषभ 

तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या (Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

  • कर्क :

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. 

  • सिंह :

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील - कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. 

  • कन्या :

बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे - कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. 

  • तुळ

अतिरिक्त ज्ञान व कौशल्ये शिकून घेण्यासाठई तुम्ही अतिरिक्त वेळ आणि ऊर्जा खर्च केलीत तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

  • वृश्चिक :

धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल. 

  • धनु :

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. लवमेट आज तुमच्या कडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु, तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो.

  • मकर

थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या.

  • कुंभ :

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. 

  • मीन :

तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकतात. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT