Detox Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Detox Drink: शरीराला डिटॉक्स करण्यासाठी 'या' 3 गोष्टींचे एकत्र करावे सेवन

काकडी, लिंबू आणि पुदिना यापासून तयार केलेले डिटॉक्स पाणी प्यायल्याने तुम्हाला वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत फायदा होईल.

Puja Bonkile

Detox Drink: अनेकदा आपण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतो. पण जे लोक आरोग्याबाबत जागरूक असतात, ते गरम पाणी पितात किंवा मध, लिंबाचा रस आणि गरम पाणी पितात. 

याचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत. पण तुम्ही काकडी, लिंबू आणि पुदिन्याचे पान रात्रभर पाण्यात भजत ठेवुन सकाळी पाणी पिल्यास अनेक फायदे होतील. हे तिन्ही तुमचे आरोग्य उत्तम ठेवतील. याशिवाय तुम्हाला चमकणारी त्वचाही मिळेल. 

म्हणूनच तुम्ही हे पाणी रोज सकाळी सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दिवसभर हे पाणी थोडे थोडे पिऊ शकता. चला तर मग जाणून घेउया हे पाणी पिण्याचे पायदे काय आहेत.

  • डिटॉक्स वॉटर पिण्याचे फायदे

1. या पाण्याने तुमचे शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहील. कारण त्यामध्ये असलेल्या काकडीत 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याशिवाय त्यात शरीर थंड करण्याचे गुणधर्मही आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. दुसरीकडे, लिंबूमध्ये असलेल्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. पुदिन्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

2. हे पाणी प्यायल्याने वजन कमी (Weight Loss) होण्यासही मदत होते. हे पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर राहते. चयापचय दर वाढतो. चरबी आणि कॅलरीज बर्न होतात.आपल्याला बराच काळ पोट भरलेले वाटते. त्यामुळे तुम्हाला समाधान वाटते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

3. रोज सकाळी हे पाणी प्यायल्याने पचनाला चालना मिळते. पचनक्रिया गतिमान होते. पचनशक्ती मजबूत होते आणि पोट सहज साफ होते. मल जाणे सोपे होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

4. या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे तुमचे शरीर पूर्णपणे डिटॉक्स करतात. शरीरातील खराब पदार्थ लघवीद्वारे सहज बाहेर काढले जातात.

5. हे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. शरीरातून घाण बाहेर पडते, ज्यामुळे त्वचा (Skin) देखील सुधारते.मुळ आणि मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो.त्वचेचा रंग स्पष्ट होतो.

6. लिंबू, पुदिना आणि काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, अशावेळी ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT