Crossing Your Legs Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Crossing Your Legs: पायावर पाय देऊन बसल्याने शरिरावर होतात अनेक दुष्परिणाम

पायावर पाय देऊन बसण्याची अनेक लोकांना सवय असते पण हीच सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Puja Bonkile

Crossing Your Legs: पायावर पाय देऊन बसण्याची अनेक लोकांना सवय असते पण हीच सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण काही वेळा महिलांना खास आउटफिट घालून या प्रकारे बसणे कम्फर्टेबल वाटते.पण नेहमीच कम्फर्टेबल न राहता पायावर पाय देऊन बसल्याने आरोग्याशी संबंंधित देखील आजार उद्भवतात.चला तर मग जाणून घेऊया पायावर पाय देऊन बसल्याने कोणते गंभीर नुकसान होतात.

  • पायावर पाय देऊन बसण्याचे दूष्परिणाम

पायावर पाय देऊन बसल्याने गुडघ्याच्या खाली असलेल्या मज्जातंतूवर जास्त दबाव पडतो. यामुळे वेदना किंवा क्रॅम्प येण्याची समस्या उद्भवते.

पायावर पाय देऊन बसल्याने रक्तदाब वाढण्याची समस्या होऊ शकते. कारण संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण होत नाही. त्यामुळे हृदयावर दबाव येतो आणि रक्तदाब वाढू शकतो. ज्या लोकांना आधीच बीपीची समस्या आहे, त्यांनी या पोझिशनमध्ये बसू नये.

बराच वेळ क्रॉस-लेग्ड स्थितीत बसणे म्हणजे एक पाय दुसऱ्या पायावरवर ठेवल्याने एका पायावर अधिक दबाव येतो. त्यामुळे पाय सुन्न होण्याची शक्यता असते. यामुळे रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते.

काही लोकांना ब्लड क्लोटिंगची समस्या असते. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर चुकूनही या पोझिशनमध्ये बसू नका. कारण क्रॉस लेग बसण्याची स्थिती ब्लड क्लोटिंग वाढवू शकते.

तर काही संशोधनात असे समोर आले आहे की या जास्त वेळ पायावपर पाय देऊन बसल्याने खांदे कमकुवत होऊ शकतात.

  • व्हेरिकोज व्हेन्स

पायावर पाय देऊन बसल्याने व्हेरिकोज व्हेन्सची समस्या वाढू शकते. काही लोकांमध्ये अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा फक्त एक कॉस्मेटिक समस्या असू शकते. म्हणजेच, ते फक्त कुरूप दिसते, परंतु इतर कोणतीही समस्या उद्भवत नाही. तर काही लोकांमध्ये तीव्र वेदना आणि चालण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्ताभिसरणाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते

  • पाठदुखीची समस्या

पाठदुखीची समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे पायावर पाय देऊन बसणे होय. जे लोक बैठे काम करतात त्यांना पाठ दुखीची किंवा खांदे दुखण्याची समस्या जाणवते. यामुळे बैठे काम करतांना योग्य पोझिशनमध्ये बसणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT