Coriander Powder
Coriander Powder Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coriander Powder: झटक्यात ओळखा भेसळयुक्त धणा पावडर? वापरा 'ही' ट्रिक

दैनिक गोमन्तक

Real Fake Coriander Powder: भारतीय स्वयंपाकघर आणि प्रत्येक पदार्थांमध्ये अनेक मसाले वापरले जातात. हळद, गरम मसाला, लाल मिरची, दालचिनी आणि धणा पावडर हे सर्व एकापेक्षा एक गुणधर्मांनी भरलेले आहेत. अनेक मसाले असे आहेत जे नेहमीच वापरले जातात.

पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आजकाल तुम्ही तुमच्या भाजीमध्ये बिनदिक्कतपणे वापरत असलेल्या मसाल्यांच्या पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. 

आजकाल मसाल्यांमध्ये केमिकल, माती टाकुन विकले जात आहे. आजकाल लाल मिरची, दूध, तांदूळ प्रत्येक गोष्टीत भेसळ केली जात आहे. 

त्यामुळे ओळखणे कठीण झाले आहे. पण आज तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे, त्याच्या मदतीने तुम्ही सहज शोधू शकता की धणा पावडर खरी आहे की नकली? 

  • धणापावडरमध्ये काय भेसळ केली जाते

रिसर्च जनरल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजीनुसार, बाजारात मिळणाऱ्या धणा पावडरमध्ये जंगली गवत असते. जंगली गवत उन्हात वाळवले तर त्याचा रंग अगदी धणा पावडरसारखा होतो. इतकेच नाही तर अनेक प्रकारची जंगली गवत मिसळली जातात.

Coriander Powder
  • कशी ओळखाल ओरिजनल धणा पावडर?

धणा पावडरमध्ये पिठाइतकी धणे मिसळली जाते. पण थोडे सावधगिरी बाळगल्यास तुम्ही भेसळ ओळखु शकता.  सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा धने पावडर टाका. नंतर 10 सेकंद पाणी असेच राहू द्या. धणं वरच्या दिशेने तरंगताना दिसली तर त्यात भुसा मिसळला आहे आणि ग्लासच्या तळाशी राहिलेले धणा पावडर म्हणजे खरी धणा पावडर होय. 

ओरिजनल धणा पावडरचा वास खूप तीव्र असतो.तर जंगली गवत आणि तणांसह धणा पावडरला काहीही सुगंध नसतो. तुम्ही पावडरचा वास घेऊन सहज खरी धणा पावडर ओळखू शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT