Cooking Hacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: योग्य प्रकारे पाक बनवायचा असेल तर 'या' चुका टाळा

Cooking Hacks: गुलाब जामुन असो किंवा लाडू बनवणे असो भारतीय पदार्थ साखरेच्या पाकाशिवाय अपुर्ण आहे. योग्य पाक बनवायचा असेल तर पुढील चुका करू नका.

Puja Bonkile

cooking tips how to make perfect chashani or syrup read full story

कोणताही गोड पदार्थ साखरेच्या पाकाशिवाय पुर्ण होत नाही. भारतात गूळ आणि साखर या दोन गोष्टींपासून पाक बनवला जातो. लोकांना साखरेचा पाक बनवणं सोपं वाटत असेल, पण असे नाही. साखरेचा पाक बनवतांना खुप काळजी घ्यावी लागते. साखरेचा पाक बनवताना काही छोट्या चुका करतात ज्यामुळे पाक नीट तयार होत नाही.

  • जास्तवेळ उकळणे

पाक जास्त वेळ उकळू नका. कारण ते रंग आणि चव दोन्ही खराब करते. जेव्हा तुम्ही साखरेचा पाक बनवता तेव्हा त्यात कमी पाणी घाला आणि साखर लवकर विरघळवा, थोडा वेळ शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. जर पाक लवकर घट्ट होत असेल तर त्यात ३-४ चमचे पाणी घालून पुन्हा गरम करा. पाणी न घालता गरम केल्याने पाक जास्त घट्ट होते.

  • पाक चमच्याने ढवळा

अनेक लोक पाक बनवतांना पाणी आणि साखर टाकून तसेच उकळू देतात. पण असे कर नका. यामुळे पाक योग्य तयार होत नाही. योग्य पाक बनवण्यासाठी चमच्याने सतत ढवळत राहा.

  • भांड्याची किनार स्वच्छ करावी

अनेकजण भांड्याच्या बाजूला साचलेली साखर किंवा गूळ साफ करत नाहीत. हे नंतर पाकमध्ये मिक्स होते आणि पाक खडबडीत बनते. म्हणूनच पाक बनवतांना काळजी घ्यावी.

  • पाणी जास्त वापरणे

पाक बनवताना लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते साखर आणि पाण्याचे योग्य प्रमाण घेत नाहीत. साखरेत जास्त पाणी घालून पाक तासनतास शिजतात. जास्त पाणी घालून पाक उकळल्याने पाकचा रंग गडद होतो. त्यामुळे पाणी आणि साखरेचे प्रमाण योग्य ठेवावे.

  • चांगला दर्जेदार गूळ आणि साखर वापरावी

पाक बनवण्यासाठी पांढरी दाणेदार साखर आणि तपकिरी ताप बनवण्यासाठी गूळाचा वापर करावा. लाडू बनवण्यासाठी वेगळा गूळ मिळतो. त्यामुळे पाक बनवण्यासाठी गूळ किंवा साखर खरेदी करताना काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT