Cooking Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: एखादा पदार्थ डिप फ्राय करताना 'या' चुका टाळा

Puja Bonkile

cooking hacks and tips for deep frying: पावसाळा सुरू झाला आहे. पावसात गरमागरम भजी,बटाटावडा, समोसे, कोथिंबीर वडी, यासारख्या तळलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडणार नाही...! रिमरिझ पावसात भजी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. चहासोबत या पदार्थांची चव अधिकच वाढते.

पण हे पदार्थ कुरकुरीत आणि खुशकुशीत होण्यासाठी डिप फ्राय केले जाते, गरम तेलात तळण्यामुळे पदार्थांना खमंग वास घरात पसरतो. हे पदार्थ तळतांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

भजी, पापड, वडे यासारखे पदार्थ तळतांना सर्वात आधी तेल मध्यम आचेवर गरम करावे. कोणताही पदार्थतेल गरम झाल्याशिवाय कढईत टाकु नका.

तळणाचे पदार्थ कढईमध्ये सोडतांना नेहमी एका बाजुने सोडावे. यामुळे तेल हातावर उडणार नाही.

तळणासाठी वापरलेल्या तेलाचा वारंवार वापर करू नका. कारण हृदयाच्या आरोग्यासाटी ते तेल चांगले नसते.

तळलेले पदार्थ काढून ठेवताना तेल टिपण्यासाठी स्वच्छ टीश्यू पेपर वापरा, न्यूज पेपर वापरू नका. कारण न्यूज पेपरच्या शाईतील केमिकल्स त्यातून तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता असते.

एखादा पदार्थ कढईत सोडल्यानंतर तो लगेच पलटू नका,आधी तो थोडा क्रिस्पी होऊ द्यावा मगच पलटावा.

कोप्ता किंवा कढीपकोडा तळलेले पदार्थ लगेच ग्रेव्हीत ठेऊ नका.

कोणताही पदार्थ तळताना तो मध्यम आचेवर तळावा. ज्यामुळे तो पदार्थ आतुन चांगला शिजतो. आतुन पदार्थ कच्चा राहिल्यास पोट दुखू शकते.

तळलेले पदार्थ क्रिस्पी होण्यासाठी मिश्रणात रवा, तांदळाचे पीठ, ब्रेडक्रम, पोहे हे पदार्थ मिक्स करू शकता.

पदार्थ तळण्यासाठी योग्य तेलाची निवड करावी. कारण तळलेल्या पदार्थांमधुन तेल पोटात जाते. यामुळे तेल योग्य दर्जाचे वापरवे.

तळण्यापुर्वी कढईबाजुचा परिसर कोरडा असावा. अन्यथा तेलाच पाणी पडल्यास अपघात होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT