Concentration Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Concentration: कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग 2

Concentration: जर तुमची कार्यक्षमता चांगली असेल तर त्या कामात नक्कीच यश मिळू शकतं.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही कामात यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी आपली कार्यक्षमता असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची कार्यक्षमता चांगली असेल तर त्या कामात नक्कीच यश मिळू शकतं. म्हणूनच, यापूर्वीच्या लेखात आपण कार्यक्षमता म्हणजे काय? किंवा कार्यक्षमता वाढविण्याचे पैलू कोणते हे पाहिलं. या भागातदेखील आपण कार्यक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पैलुंचा आढावा घेणार आहोत. (Fitness benefit's: Aspects to increase efficiency- Part 2)

1. एकाग्रता (Concentration)

अनेकदा आपले लक्ष एका ठिकाणी थांबते, पण ते टिकत नाही. ही एकाग्रता एकाजागी दीर्घकाळ टिकवण्याची सवय नियमित ध्यान केल्याने लागेल. आपले चित्त एका ठिकाणी दीर्घकाळ एकाग्र न राहता परत परत विचलित होण्याला योगसूत्रात 'अनवस्थितत्व' म्हटले आहे.

2. आरोग्य (Health)

शरीरच लक्ष वेधत राहिल्यास मनाची एकाग्रता कशी साधता येईल? निरोगी आणि सुखदायक स्थितीत शरीर असण्यासाठी चार महत्त्वाच्या बाबी कारणीभूत आहेत. आहार, व्यायाम, झोप आणि योग्य जीवनशैली. असे समजा आहार म्हणजे गाडीत घालतो ते इंधन, नुसतं इंधन घालून गाडी बंद ठेवणे गाडीसाठी हानिकारक आहे, त्यामुळे तिला चालनात ठेवणे म्हणजे व्यायाम. गाडीचे नियमित केलेले सर्व्हिसिंग म्हणजे झोप आणि ती गाडी व्यवस्थित, प्रेमाने चालवणे म्हणजे योग्य जीवनशैली असणे. यातील प्रत्येक विषयावर वेगवेगळ्या लेखांमध्ये मी अगोदरच सविस्तर माहिती दिलेली आहेच. या चार गोष्टींची काळजी रोज घेतली तर त्या आपली काळजी घेतील.

दरम्यान, कार्यक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक व शारीरिक स्वास्थ कसं राखावं याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. जर या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रथम त्यासाठी नोंदणी करणं अत्यंत गरजेच आहे. म्हणूनच, या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी या लिंकवर नक्की क्लिक करा आणि तुमची नाव नोंदणी करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT