Coconut Oil For Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coconut Oil For Hair: मजबूत केसांसाठी खोबरेल तेलात मिसळा 'या' दोन गोष्टी

सतत केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरण्यापेक्षा, तुम्ही खोबरेल तेलाची ही रेसिपी वापरून पाहू शकता, ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमन्तक

Coconut Oil Benefits For Hair: अनेक लोकांना केस गळतीची समस्या असते. केस गळल्यामुळे टेकल पडण्याची शक्यता अधिक असते. यामुळे केसगळती कमी करण्यासाठी लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरायला लागतात. 

परंतु, काहीवेळा घरगुती उपाय केमिकलपेक्षा केसगळतीवर चांगला परिणाम करतात. खोबरेल तेलात कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने केसांच्या समस्या कमी होतात हे जाणून घेउया.

केस गळण्याचे घरगुती उपाय 

  • नारळ तेल आणि लिंबू 

नारळाच्या तेलामध्ये केसांना पोषण देणारे अनेक गुणधर्म असतात. या तेलातील प्रतिजैविक गुणधर्म विशेषतः केसांवर चांगला प्रभाव दर्शवतात. हे तेल केस गळणे थांबवते, केसांना आर्द्रता प्रदान करते आणि केस मजबूत बनवते. 

ते वापरण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा. खोबरेल तेलाने लिंबाच्या रसाने केसांना मसाज करा आणि किमान 20 मिनिटे ठेवल्यानंतर डोके धुवा. ही रेसिपी आठवड्यातून 2 वेळा ट्राय करु शकता. 

  • खोबरेल तेल आणि कांद्याचा रस 

कांद्याचा रस केवळ केस गळणे थांबवत नाही तर केसांच्या वाढीस मदत करते. पोटॅशियम आणि फॉस्फरससह झिंक, सल्फर, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्वे सी, ई आणि बी देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. 

ते खोबरेल तेलाने लावल्याने केसांची वाढ जलद होण्यास मदत होते. केसांना लावण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात कांद्याचा रस घाला. हे मिश्रण गॅसवर शिजवा आणि 4 ते 5 मिनिटांनी गॅस बंद करावा. 

हे तेल थंड झाल्यावर डोक्याला मसाज करावी. अर्धा तास केसांवर ठेवल्यानंतर धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही रेसिपी करून पाहिल्यानंतर त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो आणि केस गळण्याचा वेग कमी होतो. 

उन्हाळ्यात घ्यावी केसांची खास काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात सतत घाम येऊन खाज येते आणि त्यामुळे केसगळती होऊ शकते. आठवड्यातून 3 वेळा केस धुवावे. केसातील कोंडा कमी करण्यासाठी केसांच्या मुलांना लिंबाचा रस लावून 20 मिनिटापर्यंत ठेवा नंतर गार पाण्याने केस धुवावे. तसेच केसांना आवळ्याचा रस लावल्याने केस मऊ आणि चमदार राहतात. अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात देखील केस सुंदर ठेऊ शकतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT