पणजी: क्लीअरट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने समर ट्रॅव्हल सीझन जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर नेशन ऑन व्हॅकेशनची (Nation On Vacation) घोषणा केली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला ९-दिवसीय ट्रॅव्हल महोत्सवात फ्लाइट्स, हॉटेल्स आणि इतर पॅकेजेसवर मोठी सूट मिळणार आहे. यामुळे गोव्यासह विविध पर्यटन ठिकाणी जाण्यासाठी विमान भाडे आणि हॉटेल बुकिंगमध्ये मोठा फायदा होणार आहे.
सुट्टी आणि व्हॅकेशनच्या काळात विमानभाडे दर किमान १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. पण, क्लीअरट्रिप कंपनीने पर्यटकांना विविध पर्यटनस्थळांना भेट देता यावी आणि सुट्यांचा आनंद घेता यावा यासाठी ऑफरची घोषणा केली आहे.
"येत्या महिन्यांमध्ये विमानभाडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. नेशन ऑन व्हॅकेशनची प्रवाशांना ऑफर देण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना याचा लाभ घेता यावा आणि आर्थिक लाभ मिळावा", असे मत क्लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी यांनी व्यक्त केले आहे.
काय आहेत ऑफर्स?
- देशांतर्गत फ्लाइट्स ९९९ रूपयांपासून सुरू
- आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स ५,९९९ रूपयांपासून सुरू
- लक्झरी हॉटेल्स (४- व ५-स्टार) बुकिंग २,४९९ रूपयांपासून सुरू
- बस बुकिंग्जवर जवळपास ४० टक्के सूट
- हॉटेल बुकिंग्जवर ३० टक्के ते ८० टक्के सूट
ऑफर आणि बुकिंगबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
याशिवाय मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस प्लस आणि फ्लिपकार्ट व्हीआयपीसाठी १ रूपयामध्ये क्लीअरचॉईस मॅक्सची ऑफर मिळवता येणार आहे. दरम्यान ही ऑफर केवळ मर्यादीत काळासाठी उपलब्ध असून, यासाठी अटी आणि शर्ती लागू राहणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.