Tips For Washing Clothes Dainik Gomanta
लाइफस्टाइल

Clothes Washing Tips: तुमच्या मुलांचा शाळेचा युनिफॉर्म शाईमुळे खराब झाल्यास 'या' घरगुती उपायांनी करा स्वच्छ

Tips For Washing Clothes: कपड्यावरची शाईचा डाग कमी करण्यासाठी या घरगुती उपायांचा वापर तुम्ही करू शकता.

Puja Bonkile

Tips For Washing Clothes: शाळेत खोडसाळपणा करताना अनेक वेळा मुले एकमेकांच्या कपड्यांवर शाई फेकतात. त्याचबरोबर काही वेळा खिशात ठेवलेले पेन फुटल्याने कपड्यांमध्ये शाईचे डाग दिसतात.

अशावेळी दुसऱ्या दिवशी स्वच्छ गणवेशात शाळेत जाणे अवघड होऊन बसते आणि त्याची जबाबदारी पालकांना घ्यावी लागते.

अशावेळी जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शाळेच्या ड्रेसवरील शाईचे डाग स्वच्छ करण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

टूथपेस्ट

तुम्ही टूथपेस्टने घरच्या घरी कपड्यांवरील शाईचे डाग सहज काढू शकता. यासाठी डागावर टूथपेस्ट नीट लावून ठेवावी.

नंतर 10-15 मिनिटांनंतर पेस्ट सुकल्यावर कापड डिटर्जंटने धुवावे. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला डाग कमी होताना दिसतील. असे २-३ वेळा केल्याने कपड्यावरील संपूर्ण शाईचा डाग निघून जाईल.

शेव्हिंग क्रीम

जर तुमच्या घरी शेव्हिंग क्रीम असेल तर कपड्यांवरील शाईचे डाग काढणे खूप सोपे होते. यासाठी डागावर शेव्हिंग क्रीम लावा आणि 2-3 मिनिटे राहू द्यावे.

नंतर ब्रशने घासल्यानंतर डिटर्जंटने धुवावे. असे 1-2 वेळा करावे. डाग पूर्णपणे निघुन जातील.

दुध

दुधात ब्लीचिंग गुणधर्म असतात. यामुळे कपड्यांवर शाईचे डाग असल्यास दुधाच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी डाग पडलेला भाग कच्च्या दुधात रात्रभर भिजवून ठेवावा. त्यानंतर सकाळी डिटर्जंटने स्वच्छ करावे.

इतर उपाय

कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी तुम्ही लिंबू, मीठ आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट देखील वापरू शकता. त्यामुळे कपडे खराब होत नाहीत आणि डागही निघून जातात.

या तिघांची पेस्ट बनवून कपड्यावर लावावी आणि ब्रशने घासून घ्यावे. नंतर डिटर्जंटमध्ये काही वेळ भिजवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT