Cleaning Tips: निरोगी राहण्यासाठी पोषक आहारासोबतच घरात स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. घरातील फरशी चमकदार ठेवण्यासाठी जवळपास प्रत्येक घरात मॉपचा वापर केला जातो. पण तरीही मॉप वापरल्यानंतर ते कसे स्वच्छ ठेवावे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
त्यामुळे मॉप सारखे वापरून झाले की खुप खराब होते. मॉपच्या स्वच्छतेकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. जर तुम्हीही अशीच चूक करत असाल आरोग्य धोक्यात येऊ शकते. मॉप कसे स्वच्छ करावे हे जाणून घेऊया.
मॉप कापड बदलावा
प्रत्येक वापरानंतर तुमचे मॉप कापड स्वच्छ करताना तुम्ही कितीही काळजी घेतली तरीही ते वेळोवेळी बदलणे गरजेचे असते. दर 2-3 महिन्यांनी एकदा मॉप बदलावा.
कुठे ठेवावा
जर तुम्ही मॉप कुठेही ठेऊ नका. कारण यामुळे मॉप लवकर खराब होऊन त्यावप बॅक्टेरिया वाढू लागतात. अशावेळी प्रत्येक वापरानंतर मॉप स्वच्छ पाण्याने धुवावे आणि जमिनीपासून दूर थंड कोरड्या जागी ठेवावे. मॉपमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
कसे स्वच्छ करावे
मॉपिंग केल्यानंतर मॉप बादली स्वच्छ धुवावे. नंतर त्यात गरम पाणी टाकावे आणि पांढर्या व्हिनेगरचे काही थेंब टाकावे आणि त्यात मॉप भिजत ठेवावा. 15-20 मिनिटानंतर नंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवावे .
इतर उपाय
व्हिनेगरऐवजी तुम्ही ब्लीचचा वापर करून मॉप स्वच्छ करू शकता. असे मानले जाते की मॉपमध्ये असलेले बॅक्टेरिया ब्लीचने सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात.
यासाठी एका बादलीत समान प्रमाणात पाणी आणि ब्लीच मिक्स करावे. नंतर मॉप त्या पाण्यात भिजवावे आणि 15 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.