Christmas Gift For Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Gift For Kids: मुलांना द्या 'हे' स्पेशल ख्रिसमस गिफ्ट, मुलं होतील खुश

लहान मुलांना कोणते गिफ्ट द्यायचे हे समजत नसेल तर तुम्ही पुढील गोष्टी फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Christmas Gift For Kids: दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस ख्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना गिफ्ट आणि केक देऊन शुभेच्छा दिल्या जातात.लहान मुलांसाठी हा दिवस खास बनवण्यासाठी कोणते गिफ्ट द्यावे हे जाणून घेऊया.

  • ड्रॉइंग किट

जर तुमच्या मुलाला चित्र काढण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला एक ड्रॉइंग किट भेट देऊ शकता. हे मुलांना त्यांची कौशल्य वाढवण्यास मदत मिळेल. हे एक खास गिफ्ट असू शकते. तुम्हाला कोणत्याही दुकनात 500 ते 1,000 रुपयांमध्ये ड्रॉइंग किट मिळेल.

आवडती वस्तू

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला ख्रिसमस डे निमित्त त्याच्या छंदाशी संबंधित काही गिफ्ट देऊ शकता. जर तुमच्या मुलाला घड्याळ आवडत असतील तर त्याला कार्टून डिझाइन केलेले घड्याळ गिफ्ट म्हणून देऊ शकता. याशिवाय तुम्ही त्याला त्याच्या आवडत्या खेळाशी संबंधित वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. जर तुमच्या मुलाला डिजिटल उपकरणांची आवड असेल तर त्याला ब्लूटूथ ऑडिओ स्पीकर, चांगल्या दर्जाचे हेडफोन किंवा स्मार्टवॉच गिफ्ट देऊ शकता.

  • प्लेहाऊस टेंट

तुम्ही तुमच्या 5 ते 6 वयोगटातील मुलाला प्लेहाऊस टेटं देखील गिफ्ट देऊ शकता. यामुळे मुलाला त्याची स्वतंत्र वैयक्तिक जागा मिळेल, जी त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे. तुमच्या मुलाला एक फोल्ड करण्यायोग्य प्लेहाऊस टेंट गिफ्ट देऊ शकता. जो त्यांना पाहिजे तेथे सेट करू शकेल आणि त्यात खेळू शकेल. फक्त प्लेहाऊस टेंट इको-फ्रेंडली आणि सेंद्रिय पदार्थांनी बनलेले असल्याची खात्री करा.

  • पोलरॉइड कॅमेरा 

तुमच्या मुलाला पोलरॉइड कॅमेरा भेट देणे हा फोटो क्लिक केल्यानंतर लगेच प्रिंट घेणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे कॅमेरे रिफिलेबल फिल्म पेपरसह येतात आणि मुले त्यांच्या आवडीच्या कोणत्याही फोटोमध्ये स्टिकर्स, फिल्टर आणि बॉर्डर जोडू शकतात. आपल्या लहान मुलाला व्यस्त ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग देखील असू शकतो.

  • चॉकलेट बॉक्स 

जर तुमच्या मुलाला चॉकलेट आवडत असेल तर ही त्याच्यासाठी सर्वोत्तम गिफ्ट असू शकते. यासाठी कस्टम-मेड चॉकलेट बॉक्स निवडा आणि नंतर त्यात भरपूर चॉकलेट्स ठेवा. आपण बॉक्सच्या कव्हरवर आपल्या मुलाचे नाव देखील लिहू शकता. मात्र, तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही बाजारातून चॉकलेट हॅम्परही खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या मुलासोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT